८ वी   शिक्षण परिषद पनवेल येथे ११ ऑक्टोबर ला होणार "शिक्षण हक्क परिषद"



तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले. 


शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मराठी विभाग महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  दिवंगत मा. खासदार लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे गुरु महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाळा वाचवा अभियानांतर्गत ८ वी शिक्षण हक्क परिषद दि. ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० ठिकाण: सभागृह, रयत शिक्षण संस्थेचे मराठी विभाग महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल. येथे संपन्न होणार आहे, महाराष्ट्रामध्ये 62000 शाळा दत्तक देण्याचा निर्णय अदानी संस्थेकडे शासनाचा झाला आहे त्यामुळे 62 हजार शाळा वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण हक्क परिषदा आयोजित करून समाज जागृती केली जात आहे शिक्षणाचे होणारे खाजगीकरण थांबवले पाहिजे, पहिली ते आठवी ढकल्पाचा निर्णय रद्द करू सक्तीच्या परीक्षा घ्याव्यात व मराठी मिडीयम सोबत इंग्लिश मीडियम शासनाने सुरू करावे या प्रमुख विषयावर परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे या परिषदेमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत शाळा वाचवा अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचेच भाग म्हणून पनवेल तालुकास्तरीय शिक्षण हक्क परिषद 11 ऑक्टोंबर रोजी संपन्न होणार आहे तरी या परिषदेसाठी स्वागताध्यक्ष:- शिवश्री संजय घरत (लोकनेते आप्पासाहेब ना.ना. पाटील पुस्तकाचे लेखक) उद्घाटक, प्रमुख मार्गदर्शक मा.न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील साहेब (उच्च न्यायालय मुंबई) विशेष अतिथी:- मा.अतुल पाटील साहेब (लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांचे सुपुत्र) विशेष उपस्थिती मा.आमदार बाळाराम पाटील साहेब (कोकण वि. चेअरमन रयत शिक्षण संस्था) मा.डॉ. गणेश ठाकूर सर (महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल) मा.कॉ. भूषण पाटील साहेब (कामगार नेते) ह.भ.प. दादा महाराज पनवेलकर (राष्ट्रीय कीर्तनकार) मा.एन.बी.कुरणे साहेब (राष्ट्रीय महासचिव RMBKS) मा.जे.डी. तांडेल साहेब (अर्थतज्ज्ञ, सनदी लेखपाल) मा.ॲड.सिद्धार्थ इंगळे साहेब (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंन्ड्स युनियन) मा.सुधाकर पाटील साहेब (अध्यक्ष उरण सामाजिक संस्था) शिवश्री ॲड.रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) अध्यक्षता: शिवश्री. CA निलेश पाटील(व.सल्लागार शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) सूत्रसंचालन: प्रा.विजय कोंडीळकर सर (सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) कार्यक्रमाची प्रस्ताविक: शिवश्री. विकी कदम (प्रदेश प्रवक्ते शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)

 आभार प्रदर्शन: शिवश्री. राज पाटील (सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत शाळा वाचवा अभियान हे महाराष्ट्रभर सुरू आहे अभियानांतर्गत आठवी शिक्षण हक्क परिषद पनवेल तालुक्यामध्ये होत आहे तरीही सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण या परिषदेमध्ये उपस्थित राहून विशेष सहकार्य करावे व या परिषदेचे प्रसिद्ध आपण आपल्या वर्तमान पेपरला द्यावी हे आव्हान करण्यात आले.

विषय: नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे भूमिपुत्र समाजावर होणारे परिणाम व त्यावरील उपाय. 


🙏निमंत्रक:- शिवश्री हिमांशू पाटील (प्रदेश सचिव शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), 

संपर्क:- ९७६२८८५४७६, ८९८३९४४३१८

Comments

Popular posts from this blog