अंशुल कंपनीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जयवंत काका घरत सन्मानपूर्वक सेवानिवृत्त..



खारी/ रोहा - केशव म्हस्के

      धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशॉलिटी मोल्यु.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जयवंत आप्पा घरत वयोमानानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी बुधवार दि.०४/ऑक्टोंबर रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले.

      जयवंत आप्पा घरत काकांनी अंशुल कंपनीमध्ये ईमाने इतबारे प्रामाणिकपणे सेवा बजावित तब्बल २८ वर्षे ०६ महिने १५ दिवस कंपनीच्या भरभराटी व प्रगतीमध्ये मोलाचे महत्त्वपूर्ण योगदान देत शून्यातून विश्व निर्माण करीत पूर्वाश्रमीची निर्मळ केमिकल्स कंपनी  आजची अंशुल स्पेशॉलिटी मोल्यु.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सन- १९९४/९५ साली कायमस्वरूपी प्लांट ऑपरेटर म्हणून उत्पादन विभाग काम करत सेफ्टी विभाग,कॅन्टीन,आदी विविध विषय कमिटयांमध्ये काकांचे प्राधान्याने सहभाग असायचे तसेच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, कला - क्रीडा  रायगड जिल्हा कब्बडी असोसिएशन चे सदस्य आदी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संघटनात्मक काम देखील जबाबदारीपूर्वक चोखपणे बजावित आहेत..

        ज्ञत्यांच्या आजच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ प्रसंगी कंपनी उपाध्यक्ष लक्ष्मण शिट्याळकर,पर्सनल मॅनेजर किशोर तावडे,प्रोडक्शन मॅनेजर विजय खुस्पे,मनोज खाडे,सेफ्टीचे जगदीश पत्की,डीस्पॅच चे गिरीष पंडित,लॅबचे नवनाथ बागल,कामगार  संघटनेचे प्रतिनिधी अनिल सानप,चंद्रकांत थिटे,मकरंद गोविलकर,मदन मुंडे,तुकाराम कर्णेकर, माजी कामगार प्रतिनिधी भगवान गुरव,मंगेश भायदे,शशिकांत साळुंके,नितीन वारंगे, प्रदिप गुरव,विष्णू महागावकर,रविंद्र पावसे,गोविंद राजीवले,प्रदिप काजारे,नरेंद्र पोतदार आदी कामगार वर्ग व अधिकारी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून जयवंत आप्पा घरत काकांना सेवानिवृत्ती निरोप समारंभ प्रसंगी अभिनंदन करीत निरोगी निरामय आयुष्याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या .. 

छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)

Comments

Popular posts from this blog