राहटाड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ, मंगला मंगेश कंबु यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
तळा संजय रिकामे
तळा तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये राहटाड ग्रामपंचायत निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपने थेट सरपंच आणि पाच सदस्य जिंकताना एकहाती सत्ता काबीज केली होती परंतु भाजपला सत्ता टिकवता आली नाही सरपंच मिताली करंजे यांनी ६ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला होता त्याचीच पुनरावृत्ती झाली असून प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या भाजपा उमेदवार मंगला मंगेश कंबु यांनी सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी मंगला मंगेश कंबु आणि मंगेश विठोबा कंबु यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव तालुका अध्यक्ष नाना भौड,उपजिल्हा अध्यक्ष कैलास पायगुडे,तन्वीर पल्लवकर नारायण बालबा,सागर करंजे आदी मान्यवर उस्थितीत होते या पक्ष प्रवेशामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला गेला आहे.
Comments
Post a Comment