रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे "दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यागांच्या दारी "अंतर्गत तोफिक फारुक शिलावट दिव्यांगास तीन चाकी सायकल चे वितरण.
खारी/ रोहा (केशव म्हस्के)
"दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यागांच्या दारी "अंतर्गत सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नाने रोहा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता आदीं मान्यवरांच्या हस्ते सुंदर नगर रोहा येथील दिव्यांग तोफिक फारुक शिलावट यास तीन चाकी सायकल वितरण करण्यात आले.
"दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांगांच्या दारी"अभियान चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख्य उपस्थितीमध्ये जिल्हा स्तरीय मेळाव्यामध्ये"दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांगांच्या दारी " अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यागांच्या गरजांनुसार विविध प्रकारच्या योजनांचा लाभ व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले याच अनुषंगाने शुक्रवार दि.०६ ऑक्टोंबर रोजी सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नाने रोहा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता आदीं मान्यवरांच्या हस्ते सुंदर नगर रोहा येथील दिव्यांग तोफिक फारुक शिलावट यास तीन चाकी सायकल चे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय आधिक्षक डॉ.अंकिता मते, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निंबाळकर,डॉ.विश्वनाथ देशमुख, मेट्रन मॅडम सुमन गोंवदे,इन्चार्ज सिस्टर उर्वी वाणी,स्टाफ नर्स स्नेहल चांदोरकर,पूजा शिंगृत तर सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता,सचिव रमेश खराडे,खजिनदार संजय गौतम टि. टी. किरण मोहिते,सह खजिनदार निवृत्ती सुर्वे,चंद्रकांत संसारे,शिवाजी मुटके, प्रदिप रटाटे, सुरेश शेडगे,सुनिल दळवी, स्मिता विजय गजमल,जयश्री पुजारी,वैशाली पवार,सुर्वणा मांगले विशेष सल्लागार संतोष करडे,आदींसह विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Caption:- दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यागांच्या दारी "अंतर्गत सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नाने रोहा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता आदीं उपस्थितीमध्ये दिव्यांग तोफिक फारुक शिलावट यास तीन चाकी सायकल वितरण करण्यात आले.
छायाचित्र :- केशव म्हस्के ( खारी/रोहा)
Comments
Post a Comment