श्री अंबामाता नवरात्रोत्सवाची ४५ वर्षाची परंपरा. युवकांना पर्वणी. 



तळा-किशोर पितळे-

       तळा शहरातील श्री अंबामाता भैरवनाथचा नवरात्रोत्सव १९७९/८० साली मारवाड प्रांतातून व्यवसायाच्या निमित्ताने आलेले विलमराज मदनराज मेहता(देवीवाले मारवाडी शेठ) यांनी श्री अंबामातेचा फोटो तसबीर ठेवून (गरबा) दांडिया पहिला नवरात्रोत्सव सुरू केला.कै.यशवंत वेदक कै.प्रकाश पटेल,चंद्रकांत बारटक्के यांच्या सहकार्याने सोनारआळी येथे सुरु केला गरबा दांडिया रास हे त्याकाळी खास आकर्षण वाटत होते.आज संपुर्ण देशात नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्रोत्सवात श्री अंबा मातेची नऊ रुपे असून शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिध्दीदात्री अशी नऊ रुपे धारण करून दृष्टप्रवृती राक्षसांचा नाश करून विजय प्राप्त केला. या विश्वजननी चा "उदो उदो" होऊ लागला.धन संपत्ती ऐश्वर्यासाठी सरस्वतीची पुजा केली जाते.श्री अंबा माता अतीशय जागृत देवी असून अनेक भक्तांच्या मनोकामना पुर्ण केली जातात.या देवीच्या दर्शनाला माणगांव रोहा इंदापूर गोरेगांव ठाणे मुंबई येथून अनेक भाविक येऊन लाभ घेत आहेत तर काही नवस फेडण्यासाठी तर करण्यासाठी येत असतात. अशी या अंबामातेची महती आहे.विलमराज मेहता यांनी मारवाड येथील श्री अंबामाता व भैरूनाथचा कौल घेऊन गरबा सुरू केला गेली ४५ वर्षे खाजगी गरबा पंरपरा आज पर्यंत चालू ठेवली आहे.त्याकाळी अल्प लोकांच्या सहकार्यात सुरू केलेल्या सणाला तालूक्यातील वाड्यावस्तीवर आदीवासी पाड्यावर अतीशय शिस्तबध्द पध्दतीने सामाजिक सलोखा,सर्व धर्म समभाव राखीत धार्मिक पावित्र्य जपत सुरू आहे. याचे युवा पिढीला एक पर्वणीच असते. सुप्त कला गुणांना वाव देण्याची एक संधी मिळते.यामधून समाज संघटन,एकोपा यांचे दर्शन पहायला मिळते यानिमित्ताने फनी गेम्स,संगीत खुर्ची,फॅन्सी ड्रेसस्पर्धा करून बक्षीसे दिली जात आहेत.

तसेच सामाजिक, शैक्षणिक संदेश या माध्यमातून समाजापुढे ठेवली जात आहेत.या नवदुर्गाचा आनंदोत्सव साजरा करीत असताना निसर्ग सौंदर्य बहरलेले असते खरीप शेती पिके तयार झालेली असतात. शेतातील हिरवी पिवळी शेती सुष्टीत अधिक झळकते या काळात संपुर्ण वातावरण आल्हाददायी असल्याने नवरात्रोत्सव अबाल वृध्दांसह गरबा,रास दांडियाचा आनंद लुटतात.

Comments

Popular posts from this blog