आश्विनी आनंद माळी परिवार प्रतिष्ठान तर्फे बोरघरहवेली हायस्कूल मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप.
तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.
आश्विनी आनंद माळी परिवार प्रतिष्ठान तर्फे ज्ञानदीप मंदिर
विद्या मंदिर बोरघरहवेली येथे विद्यार्थी विदयार्थिनीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, याचें प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. ईशस्तवन, स्वागत गित घेतल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक रसाळ, कोषाध्यक्ष पांडुरंग माळी, प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद माळी, सचिव सचिन गायकवाड, गौतम माळी, कृष्णा राव, शाळा मुख्याध्यापिका
किरण चव्हाण, धम्म दिप सेवा संघ सोनसडे पदाधिकारी, महीला शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी, विदयार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठान चे सचिव सचिन गायकवाड, यांनी आपल्या प्राताविक भाषणात गेल्या चार वर्षे प्रतिष्ठान तर्फे
गरीब गरजु विदयार्थ्यांना व्या, पेन, पेन्सिल, पुस्तके यांचे वाटप केले जाते. आश्विनी माळी यांचे चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आज बोरघरहवेली हायस्कूल च्या विद्यार्थी विदयार्थिनीना शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे.
यावेळी शिक्षक प्रशांत शिंदे, उपस्थित मान्यवर गौतम माळी, कृष्णा भोसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment