पाटबंधारे खात्याकडून उजवा तीर कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन 



रोहा-शरद जाधव 

रायगड पाटबंधारे विभाग यांच्याकडून उजवातीर कालव्याची  पाहणी अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी वर्गांना येत्या हंगामात उन्हाळी भात शेती करता पाणी सोडणार असे आश्वासन अभियंता महामुनी यांनी शेतकरी वर्गांना दिले.यावेळी सांगडे, मालसई, उडदवणे, मुठवली, धामणसई, सोनगाव मढ़ाली, पिंगळसई  येथील असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते 

गेली पंधरा वर्षे उजवातीर  कालव्याला भात शेती करता पाणी नाही .त्यामुळे पिंगळसई व देवकान्हे विभागातील शेती ओसाड व नापीक झाली आहे. पाणी नसल्याने गुराढोरांच्या पाण्याचा, वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात रखरखते वातावरण तयार झाले. झाडे फुले सुकून जात आहेत.शेतीला पाणी नसल्याने काही शेतकऱ्यांकडून शेती विकली गेली आहे.

 सध्याची असलेली प्रचंड महागाई व वाढती बेरोजगारी पाहता शेतकरी वर्ग आता हतबळ  झाला आहे व कुठेतरी आता त्याला आपल्या पिकत्या जमिनीची आठवण होऊ लागली आहे. सध्या तरुण वर्ग हा प्रगतशील शेतीकडे  वळल्याने नवनवीन उत्पादने घेत आहेत. त्यामुळे आमच्या ओसाड जमिनीत पुन्हा आम्हाला मोती पिकवायचे आहे त्यामुळे आम्हाला आता कालव्याचे पाणी द्या जेणेकरून रोह्यातील शेती पुन्हा बहरेल. पिंगळसई , देवकांन्हे विभागातील शेतकरी वर्गाने पाण्यासाठी हट्ट धरला असून अधिकारी वर्गाने केलेल्या पाहणीत कालव्याची खूप दुरावस्था झाली असून सदर कालव्याची डागडूजी व साफसफाई करून पाणी सोडण्यासाठी अधिकारी वर्गाना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील एवढे मात्र खरे.

Comments

Popular posts from this blog