शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर

तळा कृषी विभागाकडून दोन लाखाचा निधी वर्ग


तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले. 

तळा शहरातली सुतारवाडी येथील शेतकरी कै. प्रतीक नंदकुमार सुतार (वय २९) यांचा दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी कसारा नासिक येथे रस्ते अपघात झाला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांच्या वरती रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले परंतु त्यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचे  दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी दुःखद निधन झाले.घरातील तरुण व कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले या अपघाताबाबत कृषी  पर्यवेक्षक सुनील गोसावी यांना माहिती मिळाल्यावर अपघातग्रस्त कुटूंबाची भेट घेऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना विषयी माहिती दिली व योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ती कोणाकडे मिळतात याबाबत मार्गदर्शन केले व कागदपत्रांची पूर्तता होताच कै. प्रतीक नंदकुमार सुतार यांचे वारस म्हणून त्यांचे वडील श्री नंदकुमार धोंडू सुतार यांचे नावे प्रस्ताव तयार करण्यात आला सदर प्रस्ताव दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी मा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय समितीने त्वरित मंजूर केला व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे अनुदान मागणी करण्यात आली व दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी वारसदार श्री नंदकुमार धोंडू सुतार यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाख रुपयांचा निधी कृषी विभागाकडून वर्ग करण्यात आला अश्या अडचणीच्या वेळी शासनाकडून मदत झाल्यामुळे त्यांचे वडील श्री नंदकुमार सुतार यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.



यापूर्वीच्या विमा योजनेसाठी राज्य सरकारने संबंधित विमा कंपनी, तसेच विमा सल्लागार कंपन्यांशी करार केला होता. मात्र दुर्घटनाग्रस्तांना उशिराने मिळणारी मदत व जुजबी त्रुटी काढून वारंवार प्रस्ताव नाकारण्याची कंपन्यांची भूमिका यामुळे सरकारने या योजनेत बदल केला आहे. नवीन योजनेत बाधितांच्या परिपूर्ण प्रस्तावावर तालुकास्तरीय समिती तातडीने कार्यवाही करणार आहे. त्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेत शेती करताना होणारे अपघात, रस्ता व रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, कीटकनाशके हाताळताना होणारी दुर्घटना, विजेचा धक्का किंवा अस्मानी वीज पडून मृत्यू, सर्प दंश-विंचू दंश, जनावरांचा हल्ला, चावा यामुळे होणारी जीवितहानी, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, अकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व या बाबींसह बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अश्या अपघाती घटना घडल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog