आदर्श गाव सोलमवाडी  येथे वाचन प्रेरणा दिन साजरा


तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले. 




              ए.पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सोलमवाडी गावातील मुले आणि पालकांसोबत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगाण्यात आले.वाचनाचे महत्व किती आहे याविषयी माहिती देण्यात आली. मुलांचे वाचन सुधारण्यासाठी पालकांनी आणि मुलांनी कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व मुलांना त्यांच्या आवडीनुसार गोष्टीचे पुस्तक निवडण्याची संधी देऊन त्यांना वाचन करण्यास सांगण्यात आले.सर्व मुलांना तीन - चार गोष्टीची पुस्तके भेट म्हणुन देण्यात आली. तसेच काही पुस्तके ही अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आली आहेत . 


                      

 सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामीण अध्यक्ष श्री बाळकृष्ण बांद्रे, सचिव श्री राजेश सोलम, खजिनदार श्री तुकाराम पाटेकर, सल्लागार श्री केशव सोलम, विद्यार्थी आणि पालक उपस्थीत होते. 

  


 

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही पुस्तके  देविदास बांद्रे यांनी  आपल्या आईच्या स्मरणार्थ पुस्तके ही कै.शारदा तुकाराम बांद्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आली आहेत. मुलांना खाऊ,बिस्किट्स केशव सोलम यांनी दिले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog