आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळा तालुका राष्ट्रवादी विभाग मुंबई कडुन रूग्णालयात फळ वाटप.
तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळा राष्ट्रवादी मुंबई विभागाचे वतीने केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गरीब गरजु रुग्णांना फळ वाटप केले आहे.
यावेळी तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष जनार्दन शिगवण,उपाध्यक्ष भाऊ गवाणकर, उपाध्यक्ष किसन बालगुडे, सरचिटणीस सुरेश गंभीर, युवा अध्यक्ष नितीन शिगवण, मांदाड गण अध्यक्ष संदेश वाजे, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर अंधारे, विभागीय चिटणीस पांडुरंग रायकर, अनंत राणे यासारखे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment