शाळा वाचवा" अभियानाला प्रचंड प्रतिसाद.तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले. 

बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पनवेल मध्ये ज्या कॉलेज ची मुहूर्तमेढ रोवली अशा महात्मा फुले कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स ह्या कॉलेजच्या सभागृहात शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच शाळा वाचवा अभियान अंतर्गत *८ वी तालुकास्तरीय शिक्षण हक्क परिषद* मोठ्या उत्साहात आणि तरुणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. 


परिषदेचे उद्घाटन वरिष्ठ बहुजन नेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे *मा. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब* ह्यांनी केले तर अध्यक्ष स्थानी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक सल्लागार *CA निलेश पाटील* होते, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष *शिवश्री संजय घरत* होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  अतुल दिबा पाटील आणि महात्मा फुले कॉलेज चे प्राचार्य श्री गणेश ठाकूर होते. तर संविधान वाचन *शिवश्री.विराज जाधव* यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे *प्रवक्ते शिवश्री.विकी कदम* ह्यांनी केले तर शिवराज्य प्रतिष्ठानची ध्येय धोरणे शिवराज्य चे *प्रदेशाध्यक्ष शिवश्री. ॲड रोशन पाटील* ह्यांनी मांडली तर आभार प्रदर्शन *शिवश्री. राज पाटील* ह्यांनी केले. ह्यावेळी विशेष निमंत्रित म्हणून *कॉ भूषण पाटील, हभप दादा महाराज पनवेलकर, श्री एन बी कुरणे, CA जे डी तांडेल, श्री सुधाकर पाटील, कु. विवेक भोपी, श्री संतोष पवार, श्री. रमेश पाटील, श्री. अनिल सानप, ॲड विजय गडगे, ॲड सिद्धार्थ इंगळे*, तर शिवराज्य प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पत्रकार आणि शेकडो तरुण कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समयोजनचा नावाखाली बंद पाडण्याचा शासकीय डाव हाणून पाडण्याचा, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा, त्यांची शिक्षक संख्या आणि त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याची शपथ ह्यावेळी उपस्थितांनी घेतली, संविधानाने दिलेला मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार वाचवण्यासाठी आणि प्रत्येक एक विद्यार्थ्यासाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण पोहचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानच्या शाळा वाचवा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ह्यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद नोंदवला. सर्व उपस्थितांचे राज पाटील यांनी आभार व्यक्त करून परिषदेची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog