स्वच्छता अभियानाला तळा तालुक्यातील शाळा, काॅलेज,शासकिय पंचायत स्तरावर उत्स्फुर्त प्रतिसाद.


तळा-किशोर पितळे

               भारत सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियान उपक्रमा अंतर्गत १५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे निमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनाला संपुर्ण देशात उत्तम प्रतिसाद देत,तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती तळा,नगरपंचायत,कै.नानाधर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्य यांनी तळा येथे रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आला.या अभियानात तहसील व पंचायत समीती कार्यालय, शाळा, काॅलेज परिसरात सर्व कर्मचारी यांनी एक तास स्वच्छतेसाठी काढून स्वच्छ केला हिच खरी महात्मा गांधीजींना स्वच्छतेतून श्रध्दांजली अर्पण केली.तसेच सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र,एसटी स्टॅन्ड, बाजारपेठ, मच्छी मार्केट परीसर तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील गावातील स्वच्छता केली.सारा परिसर स्वच्छ झालेला दिसून येत आहे हि मोहिम एक दिवसाची न करता प्रत्येकांनी रोज परिसर स्वच्छ कसा राहील, रोगराई पसरणार नाही डास, किटक,यांचा उपद्रव होण्याला प्रतीबंध होऊ शकेल व आपले आरोग्य सुदृढ  कसे राहील याची काळजी घेणे हाच संदेश दिला जात आहे.

Comments

Popular posts from this blog