मालसई गावचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मारुती धनावडे यांचे निधन
रोहा- शरद जाधव
रोहा तालुक्यातील मालसई गावचे ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मारुती भिकू धनावडे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले
मारुती भिकू धनावडे हे प्रगतशील शेतकरी होते. गावच्या सामाजिक धार्मिक कामात सक्रिय सहभागी होते. शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्षे एकनिष्ठ कार्यकर्ते होते.धामणसई पंचक्रोशीत ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी शेती करून आपले कुटुंब सांभाळले त्यांचा गोतावळा खूप मोठा आहे, सुधागड तालुक्यातील पोटलज या गावी त्यांचा धनावडे भावकी व खूप मोठा परिवार आहे. तीन मुले,एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रायगड जिल्हा परीषद बांधकाम विभाग रोहा येथील बळीराम अण्णा धनावडे यांचे ते वडिल होते.
त्यांच्या अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय जमला होता दशक्रिया विधी शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी तर उत्तर कार्य मंगळवार दि. 7 नोहोंबेर रोजी मालसई येथे होणार आहेत.
Comments
Post a Comment