धामणसई आदिवासी वाडी येथे सापडला एका महिलेचा मृतदेह
रोहा प्रतिनिधी
धामणसई आदिवासी वाडी मधील महिला नाव लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्ष ती राहत असलेल्या झोपडी पासून 50 मीटर अंतरावर जंगला मधील पायवाटेवर तिला खाली बसायला पाडून तिचे तोंड जमिनीत दाबून तिला जीवे मारण्यात आले आहे. तिच्या डोक्यावर दगड ठेवलेला मिळून आला आहे.
सदर बाबत गु. र. क्र 156/23 कलम 302 भा द वी गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Comments
Post a Comment