गोकुळ डेअरी चे रोह्यात शानदार उद्घघाटन
रोहा 25 ऑक्टोबर (शरद जाधव)
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, वरसे सरपंच नरेश पाटील,अनंतराव देशमुख, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, अमित मोहिते, उद्योजक राम नाकती,उद्योजक प्रमोद भोसले, रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, गोकुळ डेरी व्यवस्थापन दयानंद पाटील, सागर टोपकर, सुनील कडूकर, डिस्ट्रीब्यूटर संजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मालक सुरज रामा म्हात्रे यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, गोकुळ परिवाराने दूध संकलित करून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गांना सहकार्य केले आहे. गोकुळचे नाव जगभरात आहे .रोह्यात प्रथमच गोकुळ डेरी होत आहे. गोकुळचे वीस लाख लिटर दूध दररोज संकलित होते गोकुळच्या दुधाबरोबर लस्सी पेढा असे अनेक प्रोडक्स आहेत. कोकणात सहकार क्षेत्र रुजले नाही अशी खंत आमदार अनिकेने व्यक्त करीत पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राने उभारी घेतली. गोकुळने उत्पादनाचा दर्जा चांगला टिकवला आहे. त्यामुळे रोह्यात सुद्धा गोकुळ चांगली सेवा निश्चितच देईल. पश्चिम महाराष्ट्रात जसे काम करताय तसे इथे काम करून इथल्या शेतकऱ्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी अनिकेत तटकरे यांनी गोकुळ व्यवस्थापनाकडे केली.
रामा म्हात्रे परिवार हे व्यवसायात मोठ्या जिद्दीने एक पाऊल पुढे येत आहेत कोलाड रोहा रोडवर वरसे येथे त्यांनी ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ व प्रसिध्द चहाचे दालन उभे केले आहे. येता जाता या ठिकाणी वर्दळ दिसून येते. त्यामुळे परिसराला सुद्धा वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.गोकुळ दुध डेरीचे दालन म्हात्रे परिवाराने उभे केले व दुध ग्राहकांसाठी ही पर्वणी आहे. त्यामूळे भविष्याच्या काळात नामांकित असणारे गोकुळ दुध डेअरीचा लाभ समस्त रोहेकरांना होईल व म्हात्रे परिवार निश्चित चांगली सेवा देतील असा विश्वास यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त करीत म्हात्रे परिवाराला नविन व्यवसायाच्या शुभेच्छा दिल्या
प्रास्ताविक व आभार तांबे यांनी व्यक्त केले
यावेळी आलेल्या मान्यवर व उपस्थितांनी गोकुळ लस्सीचा आस्वाद घेतला.
Comments
Post a Comment