सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शासकीय योजना शिबिर मालसई-रोहा येथे दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडले


रोहा -प्रतिनिधी 

यावेळी 190 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी 

आयुष्यमान भारत कार्ड

किसान सन्मान निधी योजना

पॅन कार्ड

श्रम कार्ड

आभा कार्ड

जनधन अकाउंट

माझी कन्या भाग्यश्री योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

अश्या सर्व योजनांचं नागरिकांना मोफत लाभ देण्यात आले.

सदर शिबिरात सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक रोशन चाफेकर,अध्यक्ष किरण कानडे व सचिव हाजी कोठारी यांनी योजनांवर योग्य मार्गदर्शन केलं आणि ती योजना लोकांना शेवटंपर्यंत कशी भेटेल याचे आश्वाशन  दिले.

सुराज्य विविध योजनाचे लाभ नागरिकांना मिळवून देत असते. या शिबिराच्या माध्यमतून लोकांचे प्रश्र्न जाणून घेवून त्यावर पुडील कार्यक्रम कसे करता येतील याची सुद्धा नियोजन करुन लवकरात लवकर आपण करू असे रोशन जी यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख म्हणुन  अनिल घरजले,कृष्णा गोमतांदेल, रिया कासार,, रिद्धी बोथरे, सोशल मीडिया प्रमुख कुणाल आंबळे सल्लागार कमलेश चांदेकर

सुराज्य चे मालसई विभाग प्रमुख शुभम मोहिते तसेच मालसई ग्रामपंचायत चे उपसरपंच निलेश मालुसरे , संजय मोहिते, स्वप्नील मालुसरे, दिनेश मालुसरे,नरेश मालुसरे ,एकनाथ मोहिते, आदित्य मालुसरे,साईराज मोहिते, सौरभ मोहिते,आकाश मोहिते , चरण मालुसरे,रोशन चाळके, नरेश मोहिते,श्रवण मोहिते,अभिषेक चाळके,शिवराज चाळके, निखिल सुर्वे.दिनेश मुठके,विशाल बामणे , निमेश मालुसरे, यांनी मेहनत घेतली.सदर शिबीर भविष्यात जास्तीत जास्त गावात राबविण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे रोशन चाफेकर यांनी सांगितले.

सुराज्य सामाजिक  प्रतिष्ठान-रोहा


Comments

Popular posts from this blog