पिंगळसई प्रिमियर लिग [PPL] क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात संपन्न
अप्रतिम नियोजन व खेळाडूंचा उत्साह; ग्रामस्थांनी केले कौतुक
रोहा-प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे पिंगळसई ता.रोहा येथे प्रिमियर लिग PPL सामने दिनांक 5 मार्च व 6 मार्च २०२३ रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पिंगळसई येथील देशमुख आळी,मधली आळी,पिंपळ आळी आणि आदिवासी वाडी या सर्व ठिकाणच्या क्रिडाप्रेमींनी या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.कमिटी मेंबर्सनी उत्कृष्ट नियोजन केले होते.यामध्ये एकूण 8 टिम बनविण्यात आल्या होत्या.गावदेवी आई जोगेश्वरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन सामन्यांचे उद्धघाटन पिंगळसई गावच्या सरपंच सौ.शारदा शिवाजी पाशीलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सामन्यांमुळे गावातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला.प्रत्येक संघ मालकाने आपापल्या टीमकडे विशेष लक्ष पुरविले होते.
होळीचा सण व प्रिमियर लिग निमित्ताने गावातील सर्व मुले एकत्र आलेली पाहायला मिळाली.
अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या सामन्यांमध्ये यामध्ये प्रथम क्रमांक सुनिल स्मृति आयांश आणि द्वितीय क्रमांक मराठा वॉरियर्स यांनी पटकावला.
कमिटी मेंबर्स म्हणून निलेश बामणे, तेजस खामकर, अभि देशमुख ,विनय गुड्डू शिंदे,सुरज मुन्ना खेरटकर यांनी उत्तम नियोजन केले होते.
तर संघमालक -भरतराजे देशमुख ,तानाजी देशमुख, संकेत देशमुख,बबन मोहिते,संतोष खेरटकर,सतिश मोहिते,कैलास फुलारे,कैलास मुटके,अमोल देशमुख,वैभव देशमुख,व्यंकटेश देशमुख,सौरभ जाधव,सुशांत जाधव,दिपक देशमुख,सचिन देशमुख,अनिल देशमुख,तेजस देशमुख,जगदीश देशमुख,रविंद्र देशमुख,लीलाधर देशमुख,सोमेश देशमुख व गावांतील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मोलाचे योगदान दिले.
Comments
Post a Comment