सरपंच ज्योती कैलास पायगुडे "स्वच्छ सुजल शक्ती" पुरस्काराने होणार सन्मान
तळा -संजय रिकामे
गिरणे येथील सरपंच ज्योती पायगुडे यांनी तळा तालुक्याचा नावलौकिक देशभरात मिळवला आहे. त्यांनी सरपंच म्हणून गिरणे ग्रामपंचायतीमध्ये नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ,रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्वच्छ सुजल शक्ती सन्मान सोहळा २०२३ स्व. ना.ना.पाटील सभागृह तळ मजला,रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे दि.९ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमात जल जीवन मिशन मध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल सौ.पायगुडे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
                   विशेष म्हणजे या सन्मानासाठी संपूर्ण तळा तालुक्यातून केवळ ग्रामपंचायत गिरणे येथील सरपंच ज्योती पायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. तळा तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून सर्वच स्तरातून पायगुडे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या संदर्भात चर्चा केली असता पायगुडे म्हणाल्या की हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा सन्मान म्हणजे गिरणे गावातील ग्रामस्थांचा सन्मान असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहेत, भविष्यातही असेच कार्य सुरू ठेवू.

Comments

Popular posts from this blog