रोह्यात अनोळखी युवतीचा खुन 

जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला घडलेल्या अमानुष कृत्याने खळबळ

रोहा-प्रतिनिधी

बुधवार दिनांक ७ मार्च २०२३ रोजी धुलिवंदन चा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला.मात्र रात्री उशिरा प्राप्त एका घटनेने रोहा तालुक्यात खळबळ उडाली.

       मिळालेल्या माहितीनुसार रोहा -अलिबाग मार्गावर मौजे वावे पोटगे गावचेहद्दित असलेल्या दगड काॕरीजवळील जंगल भागात हि घटना घडली. कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी झाडीझुडपांत एका अनोळखी मयत युवतीचे प्रेत वय 25 ते 30 वर्षे ,उंची पाच फूट पाच इंच, अंगात लाल रंगाचा कुर्ता (टॉप) त्यावर चौकटी आकाराची नक्षी, काळे रंगाचे लेगीज व गळ्याभोवती काळ्या रंगाची ओढणी त्यावर सफेद रंगाची स्टारची नक्षी अशा वर्णनाचे युवतीचे  प्रेत आढळून आले.प्रथम दर्शनी महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून ठार मारल्याचे स्पष्ट होत आहे.

     घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक रोहा पोलीस ठाणे श्री.प्रमोद बाबर व रोहा पोलिस पथक यांनी घटनास्थळी भेट दिली.

   फिर्यादी पोना.१५६०श्री.मनीष दिनानाथ ठाकूर रोहा पोलिस ठाणे यांनी दिनांक ७/३/२०२३ रोजी रात्री साडे अकरा वाजता गुन्हे रजिष्टर नंबर 35/2023 भारतीय दंड विधान कायदा कलम 302 प्रमाणे अनोळखी इसमाविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री.प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.श्री.मनिष ठाकूर व रोहा पोलिस करित आहेत.

Comments

Popular posts from this blog