रोहा बाजारपेठ शिमगोत्सवासाठी सजली
नागरिकांची खरेदीसाठी लगबग
खारी/रोहा-केशव म्हस्के
कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव.ह्या सणाची जोरदार तयारी सर्वत्र होत असल्याने रोहा बाजारपेठेमध्ये देखील किराणा सामाना पासून ते अगदी पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
रोहे शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे काम जोरात सुरू असल्याने ट्रॅफिक जॕमचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. खेड्यापाड्यात नागरिक होळी - धुलीवंदनाच्या सामान खरेदीसाठी रोहे शहरात येत असतात तसेच मुंबईवरुन गावी येणारे चाकरमानी खरेदीसाठी रोहे शहरात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
होळी स्पेशल सामान म्हणजे रंग,लहान मुलांकरिता विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांसह नैसर्गिक रंगद्रव्ये आदी खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे.
रोहा नगर परिषदेच्या व्यापारी तत्त्वावर आधारित गाळ्यांतील कटलरी मालाचे व्यापारी मराठी व्यावसायिक नरेश कान्हेकर यांच्या "सई गिफ्टस" दुकानामध्ये शहरासह - खेडोपाड्यातील महिला वर्ग,तरुण वर्ग वेगवेगळे रंग,विविध प्रकारच्या पिचकाऱ्या नैसर्गिक रंगद्रव्ये आदी गृहोपयोगी वस्तु खरेदीसाठी गर्दी करीत आसल्याचे पहावयास मिळत आहे.
Comments
Post a Comment