रोह्यात उन्हाचा उकाडा वाढल्याने शितपेयांसह कलिंगडास वाढती पसंती

 "कलिंगड फळाच्या आकारमानानुसार दरामध्ये वाढ झाली आहे" - विक्रेते निलेश मगर

खारी/रोहे~केशव म्हस्के

दिवसेंदिवस वातावरणातील उष्णतेचा पारा वाढू लागल्याने जणू काही वैशाख वणवा पेटला आहे.  सूर्य नारायण आग ओकत असून नागरिकांना तीव्र ऊन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे येणारा थकवा व शरीराचा क्षीण कमी होण्यासाठी शितपेयांसह कलिंगडाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

       फेब्रुवारी महिण्याच्या १५ तारखे पासून   वातावरणातील कमालीच्या बदलामुळे उन्हाचा उकाडा वाढल्याने सकाळी १० वाजल्यापासून उन्हाची झळ सोसावी लागते आहे. परिणामी शरीराचे तापमान संतूलीत राखण्यासाठी नागरिक शीतपेयांसह,नारळ पाणी,ऋतूमानानुसार येणारे फळ म्हणजे कलिंगडास अधिक पसंती देत आहेत.

     बाजारात हातगाडीवर मिळणाऱ्या तयार लिंबू सरबत,कोकम सरबत,अननस व संत्री तसेच मोसंबी सरबत आदी शितपेयांपेक्षा सेंद्रिय खतांचे वापर करून नैसर्गिकरित्या नदीच्या अथवा कालव्याच्या पाण्यावर सुतारवाडी - चणेरा - तळाघर - बोरघर - लांढर,वाशी येथील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती लागवड  करतात. 

     बाजारपेठेमध्ये जरी कलिंगडाची मोठी मागणी असली तरी अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी तसा पुरवठा या नियमाप्रमाणे कलिंगड फळाच्या आकारमानानुसार दरामध्ये देखील मोठी दरवाढ झालेली आहे २०/३० रुपये पर्यंत विकले जाणारे फळ आता ५०/६० रुपये पर्यंत विकावे लागत आहे - असे वांदोली येथील कलिंगड विक्रेते निलेश मगर यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले.

   वातावरणातील उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.जरा घराच्या बाहेर पडलो की अंगातून घामाच्या धारा यायला सुरूवात होते. तसेच शरीराला थकवाही जाणवतो.अशावेळेस शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन काहीजणांना लगेचच अशक्तपणाही जाणवतो.तर ऊन्हाळी हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थाने होळी पौर्णिमेपासूनच कडक ऊन्हाचा होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी नागरिक बाजारातील विविध शितपेयं,लस्सी,आईसक्रीम,दही - ताकासह कलिंगडास देखील अधिक पसंती देत असून घरी आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार म्हणून कलिंगडावर मीठ आणि चाट मसाला घालून कलिंगड खाप देत पाहुणे नातेवाईकांना  खुश करण्याचे प्रयत्न करीत समाधान मानित आहेत आपली तहान भागवून शरीराचा थकवाही दूर होत असल्याचे हावभाव चेहऱ्यावर दिसून येत असून समाधान व आनंद होत 

Comments

Popular posts from this blog