शिवछत्रपतींचे वंशज, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची महाडच्या खर्डी गावाला सदिच्छा भेट
ग्रामस्थांनी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने राजे भारावले
महाड-प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज,रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ रोजी महाड तालुक्यातील खर्डी गावाला सदिच्छा भेट दिली.
महाड तालुक्यातील खर्डी गावांत छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई श्रीमंत हरजीराजे परसोजी राजेमहाडिक यांच्या स्मारकाला त्यांनी वंदन केले. तसेच गावचा शिवकालीन इतिहास समजून घेण्यासाठी गावातील पुरातन वाड्यांना,घरांना,देवस्थानांना भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतली.यावेळी गावचे सरपंच संदेश राजेमहाडिक यांचे बरोबर संवाद साधून शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला.
राजेंच्या खर्डी गावातील आगमनाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.राजेंचे स्वागत मोठ्या दिमाखात करण्यात आले.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राजेंना अनोखी मानवंना दिली.खर्डी ग्रामस्थ व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अभिनव स्वागताने आपण भारावून गेल्याचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले.
खर्डी गावासाठी आजचा दिवस सण समारंभापेक्षा मोठा होता.
यावेळी संदेश महाडिक सरपंच,संतोष भोसले सामाजिक कार्यकर्ते,विजय महाडिक उपसरपंच,सुभाष सुतार, ग्रा. पं. सदस्य प्रशांत महाडिक माजी सैनिक,जेष्ठ नागरिक दूर्गाजी महाडिक, वसंत महाडिक, भाऊ शेडगे अनंत महाडिक, रघुनाथ महाडिक, तानाजी महाडिक, लक्ष्मण महाडिक, किसन महाडिक, भरत महाडिक,दिप्ती गावंड मॅडम, संगिता मोहिते, दर्शना वालगुडे, मनीषा महाडिक, सारिका महाडिक मोठया संख्येने ग्रामस्थ महिला व तरुण उपस्थित होते.स्वागत समारंभासाठी खर्डी शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती दिनेश गावंड ,उपशिक्षक श्रीम.राखी घोसाळकर ,उमाकांत कदम सर व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment