रोहे अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने "एक पाण्याची वाटी चिऊसाठी" उपक्रम संपन्न 

खारी/रोहा -केशव म्हस्के

 अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा रोहा च्या वतीने २० मार्च "जागतिक चिमणी दिनाचे" औचित्य साधत छोट्याश्या चिऊ ताई सारख्या मुक्या प्राण्यांना भुत दया दाखवित "एक पाण्याची वाटी चिऊसाठी" हा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविला.

       वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे रणरणते ऊन मध्येच येणारे ढगाळ आकाश असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत असून या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईजन्य परिस्थिती असते माणसांप्रमाणे वन्य प्राणी जीवांना पशु - पक्षांना देखील पिण्याच्या पाण्याची साठी वन वन भटकंती करावी लागते.

 याचा सामान करावा लागत असून मुके प्राणी - पक्षांवर भूत दया दाखवीत येथील अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार राक्षे, प्रधान सचिव दिनेश शिर्के, सर्प- प्राणी पक्षी मित्र उपविभाग प्रमुख अनिकेत पाडसे,युवा सहभाग प्रमुख प्रमोद खांडेकर आदी युवक युवती कार्यकर्त्यांनी येथील शासकीय, निम शासकीय कार्यालय पैकी प्रथम वनविभाग कार्यालय,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय,आणि पोलीस स्टेशन रोहा येथे एक वाटी तसेच आवाहन पत्र देत रोहा शाखेच्या वतीने रोहा शहरात सुमारे ५०० वाटयांचे वाटप करीत आवाहन पत्र देत रोह्यातील नागरिकांना घराच्या आसपास एक वाटी चिऊताई साठी पाणी ठेवून सामाजिक बांधिलकीचे जपणूक व्हावी व मुक्या प्राण्यांवर भूत दया दाखविण्याचे आवाहन केले.

       सदरील अंधश्रध्दा निर्मूलन समिती रोहा शाखेच्या वतीने आयोजित एक वाटी चिऊताई साठी उपक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष नंदकुमार राक्षे,प्रधान सचिव दिनेश शिर्के,सर्प व प्राणी मित्र तथा उपक्रम विभाग प्रमुख अनिकेत पाडसे, युवा सहभाग प्रमुख प्रमोद खांडेकर,नीरज म्हात्रे(सर्पमित्र), पोरे मॅडम, शुभांगी सावंत मॅडम, प्रथमेश राक्षिकर (सर्पमित्र), सोहम जाधव आदी सर्व अं.नि.स चे युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग व मोलाचे योगदान देत सदरील उपक्रम  यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog