"कीर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नाही" -हभप.भूषण महाराज तळणीकर (लातूर) यांचे प्रतिपादन

खारी/रोहा -केशव म्हस्के

 रोहे तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील भुवनेश्वर, वर्धमान रेसिडेन्सी येथील बांधकाम व्यावसायिक गणपत उमाजी पवार यांच्या वडीलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्ताचे औचित्य साधत २८ फेब्रु. व ०१ मार्च २०२३ रोजी लातूर येथील युवा कीर्तनकार हभप.भूषण महाराज तळणीकर यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.

" कीर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नसून, जीवाला परमार्थाला जोडून शिवाकडे जाण्याचा साधा सरळ मार्ग आहे"

         वर्धमान रेसिडेन्सी येथे आयोजित अध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत बुधवार ०१ मार्च रोजी सायं.०५:३० ते ०७:०० रोहा तालुका वारकरी सांप्रदायिक सामुदायिक हरिपाठ, तद्नंतर लातूर येथील युवा कीर्तनकार हभप.भूषण महाराज तळणीकर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित बहुजन भाविक भक्तांना संबोधित करीत होते." 

आजच्या एकविसाव्या शतकातील बदलत्या काळानुसार विज्ञान- तंत्रज्ञान संगणकीय प्रणाली विकसित झाल्याने माणसाचे राहणीमान उंचावले असून कथा कीर्तन पुराणे  कोणाचे उपदेश आदी परमार्थाकरिता अधिक वेळ देता येत नसल्याने अलीकडच्या कीर्तनकार प्रवचनकार मंडळींनी मोजक्या वेळ मर्यादेमध्ये सिनेमा,मनोरंजक,विनोद,गंमत जंमत करून टाईम पास न करता निवडलेल्या अभंगाला अनुसरून भागवत, श्रीमद भगवदगीता, श्री दासबोध,रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी साधू संतांच्या अभंगातीलच सोपस्कर उदाहरणासहित स्पष्टीकरण देत बदलत्या युवा पिढीला अद्यावत व शास्त्र शुद्ध माहिती दिल्यास सर्वसामान्यांना अर्थ बोध होईल  असे जनसामान्यांना आकलन होण्यासाठीचे प्रयत्न करून कीर्तन प्रवचन करणे गरजेपेक्षा अधिक वेळ घेत श्रोत्यांची करमणूक व्हावी म्हणून कीर्तन करू नये. थोडे परी नीरे कारण कीर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नाही, असे मौलिक मार्गदर्शन करताना युवा कीर्तनकार हभप.भूषण महाराज तळणीकर (लातूर) यांनी उपस्थितांना स्पष्ट सांगितले..

कार्यक्रमासाठी प्रमुख गुरुवर्य हभप.विठोबा मांडलुस्कर,नाना शिरसे,रोहिदास भाऊ महाराज दळवी,दिनेश कडव,रुपेश शेळके,रविंद्र मरवडे,नरेश दळवी,सुनिल भऊर,सचिन तेलंगे,संदेश कडव,कृष्णा पोटफोडे,पांडुरंग दळवी,शिवाजी रटाटे,अमोल बिरवाडकर, ग्रा.प.मढाली वांदोळी सरपंच हेमंत कडव, ग्रा.पं.तळाघर उपसरपंच संतोष माने,पोलीस पाटील राम सावंत,सुभाष इंगावले,पांडुरंग भोईर,गणेश सानप,महेश तुपकर आदी तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक महिला भगिनी भाविक साई भक्तांनी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्धमान रेसिडेन्सी सोसायटी कमिटी मेंबर्स, रहिवासी सदस्यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog