"स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल, ताशा व ध्वजपथक" आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

खारी/ रोहा -केशव म्हस्के 

रोहा शहरातील स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वजपथक आणि अलिबाग रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    एक सामाजिक भान ठेवून समाजाप्रती एक जबाबदारी लक्षात घेऊन रक्तदान सर्व श्रेष्ठ दान, हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने तब्बल ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने, उत्स्फर्तपणे रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांला शासकीय रक्त संकलन केंद्र अलिबाग रायगड यांचेवतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

   रक्तदान शिबिराप्रसंगी समीर शेडगे (माजी नगराध्यक्ष व शिवसेना उध्दव ठाकरे गट तालुका प्रमुख),समीर सकपाळ (माजी नगरसेवक)राजेश काफरे (युवासेना अधिकारी रोहा )महेश सरदार (माजी नगरसेवक )किशोर तावडे (अध्यक्ष किशोर तावडे मित्रमंडळ)जितेंद्र दिवेकर (माजी नगराध्यक्ष)यज्ञेश भांड ( भाजप युवा शहराध्यक्ष) आदींनी सदिच्छा भेट देत स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वजपथक राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    सदरील रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वजपथक चे सर्व पदाधिकारी आणि शासकीय रक्त संकलन केंद्र अलिबाग रायगडच्या टिमने विशेष परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog