भानंगकोंड येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
तळा- संजय रिकामे
भानंगकोंड येथील अंतर्गत रस्ता (ठोकळे) ७ लक्ष विकासकामांचे शुभारंभ श्रीफळ वाढवून आज दि.22मार्च2023 रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडले .या कार्यक्रमासाठी भानंग ग्रा.पं सरपंच रघुनाथ वाघरे, माजी सरपंच नाना दळवी,ग्रा.पं सदस्य लक्ष्मण काते,पत्रकार संजय रिकामे, दिनेश ठसाळ,सिताराम काते,हरिश्चंद्र तांबडे,रघुनाथ पागार,नामदेव तांबडे, सुनील तांबडे,यशवंत काते,पांडुरंग नटे,जयराम तांबडे,वामन घाटवळ, परशुराम ठसाळ, दत्तू घाटवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सरपंच नाना दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विकासकामे करण्यासाठी भानंग ग्रामपंचायत नेहमीच आघाडीवर असते मग ते काम कुठल्याही पक्षाकडून असो कामाचा दर्जा हा चांगल्या प्रकारे राखावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला भानंगकोंड ग्रामस्थ सिताराम काते यांनी सर्वांना सोबत घेत विकासकामांचे धोरण आज खा.तटकरे यांच्या मार्फत राबविले जात आहे.त्यांच्यामुळेच आमच्या सारख्या सर्व सामान्यांना विकास कामांच्या शुभारंभासाठी किंवा भूमिपूजनासाठी नारळ फोडण्याची संधी मिळत आहे तटकरे साहेबांचे खूप खूप आभार असे त्यांनी यावेळी सांगितले.
भानंगकोंड येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्या नंतर येथील ग्रामस्थांनी खा.सुनील तटकरे यांच्याकडे गावातील अंतर्गत रस्ता करण्याची मागणी केली होती.हे काम करण्याचे आश्वासन खा. तटकरे यांनी ग्रामस्थांना दिल्या नंतर खा.तटकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन मधून या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात आली .यासाठी सर्व भानंगकोंड ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांनी खासदार तटकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment