रायगडवासियांना लाभलेले सर्वस्पर्शी नेतृत्व आमदार आदितीताई तटकरे 

रोहा-निखिल माधव दाते

महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तसेच श्रीवर्धनच्या आमदार  आदिती तटकरे यांचा आज वाढदिवस , रायगडच्या राजकारणातील या बहुआयामी व्यक्तिमत्वास सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 अस म्हणतात की नेतृत्वाचे वाण हे उसने मिळत नाही आणि कर्तृत्व हे कधी राजकीय वारशाने प्राप्त होत नाही ते सिध्द करण्यासाठी विविध पायऱ्यांवर संघर्ष करावा लागतो तसेच स्वतःला सिद्धही कराव लागत , आदिती तटकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोकण युवती संघटक ते महाराष्ट्र शासनाच्या आठ खात्यांच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री हा प्रवास  वरवर जरी सहजसाध्य वाटत असला तरी प्रत्येक पायरीवर परीक्षा घेणारा आहे व त्या प्रत्येक परीक्षेत स्वतःला सिद्ध करत प्रसंगी उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा धिरोदत्तपणे सामना करत प्रत्येक निवडणुकीत  विजयाची मोहोर उमटवत त्यांनी आपल्यातले राजकीय अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे व करीत आहेत .

 नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व या गुणांचा त्रिवेणी संगम असलेले हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना .उद्धवजी ठाकरे यांनी  आपल्याकडील विधी व न्याय खात्याचा कार्यभार मोठ्या विश्वासाने ना .आदिती तटकरे यांच्याकडे सोपवला ही त्यांच्या कार्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली मोठी पोचपावती आहे .

 राज्य सरकारच्या आठ ते दहा खात्यांची जबाबदारी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळणे हे काही सोपे काम नाही , हे करत असतांनाच आपल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे , रायगड जिल्ह्याचे  विविध प्रश्न व समस्या सोडवण्यावर भर देणे व विविध कार्यक्रमांच्या निमीत्ताने महाराष्ट्रभर दौरे करणे हे सगळे अवघड काम अत्यंत सफाईदारपणे त्यांनी केलेले आहॆ. 

सत्ता असतांना व सत्ता नसतांनाही त्यांनी आपल्या मतदारसंघाला काही कमी पडू दिलेले नाही. 

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे व प्रोग्रेसिव्ह राजकारणामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे .

 राज्याच्या राजकारणात जाण्याआधी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणुन त्यांनी केलेली दमदार कामगिरी रायगडवासियांच्या चिरकाळ स्मरणात राहील अशीच आहे .

पालकमंत्री झाल्यानंतर आलेली कोरोना महामारी ,निसर्ग चक्रीवादळ ,महाडचा जलप्रलय ही संकटे ना.आदिती तटकरेंच्या नेतृत्वगुणांची परीक्षा बघणारी होती या परीक्षेतही ना .आदिती तटकरे या अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्या .

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांना साधनसुचीतेच यथोचित भान ठेवत काम करणे आवश्यक असते ते भान नेहमीच आदिती तटकरेंनी ठेवल्यामुळे त्या इतर राजकारण्यांपेक्षा नेहमीच उजव्या वाटतात. 

 आदिती तटकरेंकडे असलेली सकारात्मक ऊर्जा व घेतलेले काम तडीस नेण्यासाठी स्वतः ग्राउंड लेव्हलला उतरून काम करण्याची त्यांची असलेली तयारी यामुळे त्यांचे भविष्य निश्चितच उज्वल आहॆ .

 पुढे जाऊन त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे ( ती क्षमता त्यांच्या नेतृत्वात नक्कीच आहॆ )अशी त्यांच्या मतदारसंघातील त्यांचा एक हितचिंतक व रोहेकर म्हणून आमची इच्छा आहॆ व एकदिवस  ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा सार्थ विश्वास आहॆ .


                    

Comments

Popular posts from this blog