दमखाडी येथे शिवस्मरण मित्र मंडळाच्यावतीने  शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न

 महिलांकरीता आयोजित "स्त्री सौभाग्याचा-होम मिनिस्टर खेळ पैठणीचा"ने आणली विशेष रंगत

खारी/रोहा- केशव म्हस्के

     रोहे शहरातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या अध्यात्मिक,धार्मिक, व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दमखाडी संत गोरोबा नगर येथील शिवस्मरण मित्र मंडळाच्या वतीने तिथी प्रमाणे शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजी फाल्गुन कृष्ण शाली वाहन शके १९४४ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.

  पहाटे रुद्राभिषेक,रोहा तहसीलदार कविता जाधव, माजी उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, माजी कुंभार समाज अध्यक्ष काशिनाथ धाटावकर,नरेश पडवळ,नगरसेविका गिताताई पडवळ,रायगड भूषण हभप.बाळाराम महाराज शेळके,बापू लिंबोरे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ज्ञानाची ज्योत, दिप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प मालिका अर्पण करण्यात आले. तदनंतर निर्माता दिग्दर्शक तेजस म्हात्रे सूत्रसंचालक विनोदी कलाकार यांनी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच महिलांकरिता आयोजित "स्त्री सौभाग्याचा"होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाने चांगली रंगत आणली, प्रत्येक सहभागी  महिलेस आत्मसन्मान पूर्वक बक्षिस देण्यात आले.

   यावेळी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे,उद्योजक बापू लिंबोरे,रोहा तहसीलदार कविता जाधव,पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, माजी उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, माजी कुंभार समाज अध्यक्ष काशिनाथ धाटावकर,नरेश पडवळ,नगरसेविका गिताताई पडवळ,रायगड भूषण हभप.बाळाराम महाराज शेळके,प्राणी पक्षी मित्र कुमार देशपांडे,मकरंद जोशी, अशोक धाटावकर,आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी सदिच्छा भेट देत शिवस्मरण मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवस्मरण मित्र मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक नरेश पडवळ, मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल धाटावकर,उपाध्यक्ष अतिश धाटावकर,विनायक धाटावकर,खजिनदार राकेश खालापकर,भूपेंद्र धाटावकर,गिरीश घोसाळकर,संजय बारणेकर आदी मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog