रोहा तालुक्यात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह
मृतदेह सापडण्याच्या दुसऱ्या घटनेने पुन्हा खळबळ
रोहा-प्रतिनिधी
वावेपोटगे येथे युवतीचा खुन केलेला मृतदेह नुकतेच आढळून आला होता.पोलिस सदर खुन प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना अचानक आज आणखी एक मृतदेह आढळून आला.
रोहा तालुक्यातील गोफण येथील खाडीमध्ये सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या इसमाने आत्महत्या केली की या इसमाचा घातपात करण्यात आला याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार या इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे आहे. सदर इसमाने काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे व पायात स्पोर्ट शूज आहेत. सदर इसमाची ओळख पटविण्यासाठी कोणाला काही माहिती असल्यास रोहा पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे.
दरम्यान वावे पोटगे येथे खुन करुन टाकलेल्या युवतीच्या मृतदेहाशी ह्या व्यक्तीच्या मृतदेहाचे धागेदोरे पोहचतात का?याबाबत चर्चा सर्वत्र सुरू आहे.रोहा पोलिसांच्या तपासाअंती सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.
Comments
Post a Comment