रोहा शहरामध्ये महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्षा निमित्त रोहा शहरातील रस्ते व सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान संप्पन्न

रोहा -विशेष प्रतिनिधी

 महाराष्ट्र भूषण डॉ .श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त डॉ .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने व पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ता.१ मार्च २०२३ रोजी रोहा शहरातील सरकारी कार्यालयांचा परिसर व प्रमुख रस्त्यांची साफ सफाई करण्यात आली या मोहिमेला श्री सदस्या सह इतर व्यक्तींचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 यावेळी रोहा शहरात तालुक्यातील श्री बैठकी मधून एकूण ११३९ श्री सदस्य उपस्थित होते तसेच एकूण ६० सरकारी प्रतिनिधी व कर्मचारी यांनी सहभाग दर्शविला या मध्ये रोहा प्रांताधिकारी श्री ज्ञानेश्वर घुटवड,रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी धीरज किशोर चव्हाण,नायब तहसीलदार राजेश थोरे,दिवाणी न्यायाधीश श्री एस एस महाले,रोहा पोलीस निरीक्षक श्री संजय बाबर,रोहा रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री अजय कुमार मीना रिझर्व्हेशन मास्टर विजेंद्र सिंग,उपनिरीक्षक रेल्वे स्टेशन राकेश पाटीदार, पी डब्लू डी शाखाधिकारी मकरंद घाडगे, आगार व्यवस्थापक श्रीमती सोफिया मुल्ला, उपवन संरक्षक अप्पासाहेब निकत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

थोर निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी झाला हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांनी निरूपण मध्यामा द्वारे समाज प्रबोधन व जनजागृती करून जनतेच्या मनातील अवगुणरुपी कचरा व विषय विकार रुपी जळमटे साफ करून त्यांना मनाने निर्मळ करून तनामनाने स्वच्छ व निरोगी समाज घडविण्याचे कार्य नानासाहेबांनी ८० वर्षा पूर्वी १९४३ पासून श्री बैठकीच्या माध्यमातून सुरू केले होते त्यांचे हे कार्य डॉ अप्पासाहेब व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनी अव्याहत पणाने सुरू ठेवले आहे त्यांच्या कार्याला अभिवादन आणि वंदन म्हणून ठिकठिकाणी हे  स्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉ नानासाहेब यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता आणि आता नुकताच डॉ अप्पासाहेब यांना देखील त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. वैशिष्ट्य म्हणजे एकाच घरात २ महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा एकमेव आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे त्या मुळे श्री सदस्य आणि सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला आहे.

हे स्वच्छता अभियान सकाळी ८ ते साडे ११ या वेळेत करण्यात आले रेल्वे स्टेशन मधून ३.५ टन तर संपूर्ण रोहा शहर सरकारी कार्यालय परिसरातून २५.९ टन कचरा गोळा करून डंपिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला सर्व नागरिकांनी प्रतिष्ठान च्या या उपक्रमा बद्दल कवतुक करून समाधान व्यक्त केले आणि अतिशय उत्तमरित्या हे अभियान संप्पन्न झाले.



Comments

Popular posts from this blog