वाली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. उद्देश देवघरकर यांच्या घराला भीषण आग 

लाखो रुपयांचे नुकसान

रोहा-प्रतिनिधी

यावर्षी फेब्रुवारी -मार्च महिन्यात उन्हाच्या झळा प्रचंड जाणवत आहेत.वातावरणात कमालीची रखरखता वाढली असताना एखाद्याचा राहता निवारा आगीच्या भक्ष्यस्थानी गेला तर काय परिस्थिती ओढवू शकते? ह्या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहतो.प्रत्यक्षात हि परिस्थिती कोणावरही येऊ नये असे वाटत असतानाच रोहा तालुक्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे.

बुधवार दिनांक १ मार्च २०२३ ची सकाळ देवघरकर कुटूंबियांच्या जीवावर बेतनारी ठरली.

 सकाळी ठिक १०:३० वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील वाली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.उद्देश देवघरकर यांच्या घराला आग लागल्याची घटना घडली.सुरूवातीला थोड्या प्रमाणात लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले आणि बघता- बघता होत्याचे नव्हते झाले. 

आगीचे खरे कारण कळू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमुळे घराचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे.

वाली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.उद्देश देवघरकर हे परिसरात सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत.आता त्यांच्यावरच प्रसंग आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.

Comments

Popular posts from this blog