धडाकेबाज पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली रोहा पोलिसांची दमदार कामगिरी

तब्बल 1800 लिटर गावठी दारू व दारुचे अड्डे केले नष्ट

अड्डे नक्की आहेत तरी कोणाचे?- रोहा पोलिसांचा बारकाईने शोध सुरु

रोहा-दिप वायडेकर

      गेल्या काही दिवसांपासून रोहा तालुक्यामध्ये गावठी दारूची आयात वाढलेली दिसून येत आहे. ही गावठी दारू इतकी घातक आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये ही दारू पिऊन काही लोकांचा बळी सुद्धा गेले आहेत. परंतु ही दारू कुठून येत होती?याचा छडा काही लागत नव्हता. 

रोहा पोलिसांनी याकडे बारकाईने लक्ष देत रोहा तालुक्यातील दीव, कोपरी,न्हावे येथील गावठी दारूच्या हातभट्टीच्या अड्ड्यांचा शोध घेतला. 

तेथे आज सकाळच्या सुमारास प्रोविजन रेड केली. आणि तेथून तब्बल 1800 लिटर म्हणजेच सुमारे 35000 रुपयांची गावठी दारू जप्त केली.

 त्या दारूचा जागीच नायनाटही करण्यात आला. तेथील बेवारीस अड्डे संपूर्णतः नष्ट करण्यात आले. 

ही धडक कारवाई रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. काजरोळकर, पो.हवा.गदमले, पो.ना.पाटील यांनी केली. पुढील तपास रोहा पोलीस करत आहे.

Comments

Popular posts from this blog