रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल व ग्रामपंचायत रोठ खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

रोहा-प्रतिनिधी

   सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल चे काम उल्लेखनिय असून सामाजिक हितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना आज दिनांक १८-०९-२०२२ रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या वतीने ग्राम पंचायत रोठ खुर्द ता.रोहा आई भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


 सदर कार्यक्रमास ग्राम पंचायत पूर्ण कमिटी व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. सुरूवातीला ग्रामस्थांनी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . जवळ जवळ १०० फळ झाडांची लागवड करण्यात आली. 

   कार्यक्रमात ग्राम पंचायत रोठ खुर्द च्या सरपंच सौ.गीता जनार्दन मोरे, रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे अध्यक्ष रो. सुचित पाटिल, उपसरपंच सौ.सुनीता मोरे,माजी सरपंच लिलाधर मोरे,माजी उपसरपंच देवराम कर्णेकर,आगरी समाज तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, ग्राम अध्यक्ष रो.लक्ष्मण मोरे, ग्राम पंचायत सदस्य राकेश मोरे, मंगेश मोरे, जनार्दन मोरे, प्रकाश डाके,नरेश मोरे, जेष्ठ नागरिक लक्ष्मण मोरे, गोपाळ जोशी, राजेश बोरेकर, सुशांत मोरे,व असंख्य ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.तसेच रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल चे सचिव रो.देवेंद्र चांदगांवकर, खजिनदार  रो.विजय दिवकर,पास्ट प्रेसिडेंट रो. कैलास जैन, रो.गणेश सरदार, रो.अजित तेलंगे,रो.संदेश कापसे,रो.दिपक सिंह,रो.रतिश मगर,रो.गितराज म्हस्के,रो.मनोज बोराणा, ग्रामसेवक प्रमोद तरे ,ग्रामसेविका सौ.विद्या पाटील.सौ.संध्या दिवकर तसेच रोट्रॅक्टटर्स  देवश्री जंगले,सृष्टी वाणी,आशुतोष नांदगावकर,यश शिंदे ,मीतेश गायकर,चिन्मय पोटे.आदी रोट्रक्टर्स उपस्थित होते.शेवटी अध्यक्ष सुचित पाटील यांनी ग्राम पंचायत रोठ खुर्द व ग्रामस्थांचे सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog