गायत्री पतसंस्थेची २१ वी वार्षिक सभा संपन्न

खारी/रोहा- केशव म्हस्के

रोहे तालुक्यातील भुवनेश्वर येथील गायत्री नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२७/०९/२०२२ रोजी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वालेकर आण्णा यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली.

     सर्व प्रथम दिपप्रज्वलन करीत सरस्वती मातेच्या पूजनाने सभेस प्रारंभ करण्यात आले.

    सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इत्तिवृत वाचून सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे अहवाल,ताळेबंद,नफा - तोटा पत्रक मंजूर करून नफा वाटणीस मंजुरी देण्यात आली मागील वर्षाचे हिशोब तपासणी अहवालाचे वाचन करण्यात आले.

         यावेळी व्हॉईस चेअरमन सुकुमार पाटील,सेक्रेटरी संताजी ठाकूर,कोषाध्यक्ष दिलीप देशमुख,तज्ञ संचालक मंगेश शरमकर,मारुती शिवराम गोळे, दिपक विनायक पाटील,सुरेश नारायण कवळे,संजय आत्माराम पाटील,केशव रघुनाथ म्हस्के,रोहित रमेश गोविलकर,विशाखा विवेकानंद पोटे,स्वाती अरविंद पाटील आदी संचालक मंडळ कार्यालयीन कर्मचारी मनस्वी पाटील,दैनिक बचत प्रतिनिधी गजानन पाटील, नितेश म्हात्रे,आदी कर्मचारी वृंद व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सभेचे प्रास्ताविक सेक्रेटरी संताजी ठाकूर यांनी केले तर वार्षिक अहवाल ताळेबंद वाचन कोषाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले,आभार प्रदर्शन तज्ञ संचालक मंगेश शरमकर सर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog