आमडोशी येथील परोपकारी वृत्तीचे कृष्णा जांभेकर यांचे निधन

खारी-रोहे (केशव म्हस्के)

रोहे तालुक्यातील आमडोशी येथील रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  कृष्णा साधुराम जांभेकर यांचे रविवार दि.२५/०९/२०२२ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

      कृष्णा जांभेकर हे अत्यंत साध्या सरळ प्रेमळ,परोपकारी वृत्तीचे,मित भाषी ,नम्र स्वभावाचे व दयाळू अंत:करणाचे होते, त्यांचे वडिलोपार्जित शेतीवर व मुक्या प्राण्यांवर विशेष प्रेम होते.

     त्यांच्या निधनाचे वृत समजतात कुणबी बांधवांसह, पंचक्रोशी परिसरातील सामाजिक,शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील  प्रतिष्ठित मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय मित्र परिवार व सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या निधनाने जांभेकर परिवारासह संपूर्ण पंचक्रोशी परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. 

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,दोन मुली नातवंडे, भाऊबंध आप्तस्वकीय,सगे सोयरे,नातेवाईक असा मोठा परिवार आहे.                              

त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार.दि.०४ ऑक्टोंबर रोजी ग्रामदैवत श्री.माणकेश्वर मंदिर येथे होतील.तर अंतिम धार्मिकविधी तेरावे शुक्रवार ०७ ऑक्टोबर रोजी आमडोशी,पो.पाटणसई,रोहा - रायगड निवासस्थानी होतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog