"कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते"-खा.सुनिल तटकरे

जेष्ठ कार्यकर्त्यांशी खासदार सुनिल

 तटकरे यांनी साधला मनमोकळा संवाद

तळा -संजय रिकामे

रायगड- रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी वयोवृध्दां सोबत बैठक घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्याशी संवाद साधला तळा तालुक्यातील वयोवृध्दांसह जेष्ठ कार्यकर्ते समवयस्क यांच्या भेटीसाठी खा.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास पायगुडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.यावेळी खा.सुनील तटकरे यांनी मला मोठी ऊर्जा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी हिराचंद तांबे,पत्रकार पुरुषोत्तम मुळे,गणपत मांडवकर,महादेव गोळे,रघुनाथ शिंदे,काशिनाथ तांदलेकर,नथुराम अडखळे, आझाद म्हसकर, इसमाईल पल्लवकर,जाणू पाजणे,हाफीज भाई, भागोजी गोरीवले अशोक वाढवळ,तटकरे बुवा  विठोबा साबळे,आप्पा कदम, साधुराम पिंपळे,किसन मालुसरे, खांडेकर मामा,अशोक पाशीलकर दत्ता कांबळे,दीपक कोटिया,मारुती शिर्के, जाणू कीर्तने आदी मंडळी उपस्थित होती.खा.तटकरे यांनी त्यांच्या बरोबर मन मोकळ्या गप्पा तर मारल्याच शिवाय तेथेच या जेष्ठांसोबत जेवणही घेतले.   

                           यावेळी सुखदुःखाच्या गप्पा मारून एकमेकांना विविध समस्यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.यामुळे सर्वानाच एक ऊर्जा मिळाली खा.तटकरे गावातील जुन्या मंडळींना भेटणार त्यामुळे तटकरे यांच्या समवेत असलेल्या जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला.खा.तटकरे यांना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता तटकरे यांनी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या व एकत्र जेवण केले. यावेळी तटकरे म्हणाले की तुम्हां सर्वांना भेटून मला मोठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे.                                                              

                            समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता निश्चितपणे थांबत असते.फक्त आपण आपले काम प्रामाणिक पणे करत रहाणे गरजेचे आहे.तळा तालुक्याच्या निर्मिती पूर्वी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाचे माझे कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध आहेत.अशा भेटीगाठींमळे  काम करणार्यास नव्याने अधीक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी केले.तळा येथे जेष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद करताना ते  बोलत होते.पूढे बोलताना तटकरे म्हणाले की,एक परिपूर्ण कार्यकर्ता तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.समाजातील सामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्यांची असून अडचणीच्या काळात ठाम पणे उभे रहाणे गरजेचे आहे.इतरांसाठी आपला वेळ देणे ही बाब सूध्दा तेवढीच महत्वाची आहे. सामाजिक प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी कोणी पूढे येत असेल तर त्यास सहकार्य करावे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनतेने सूध्दा खंबीरपणे रहावे असे अवाहन केले.                                     
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खा.तटकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली काही ज्येष्ठांनी तटकरे साहेबांना बघितल्यावर मन भरून येते एक वेगळीच ऊर्जा मिळते तर काहींनी साहेब अनेक झाले पण आमच्या गावात आम्ही एकाच साहेबांना मानतो ते म्हणजे तटकरे साहेब, एका मुस्लिम बांधवांनी तर असे सांगितले की मी नमाज पडून आल्यानंतर माझ्या कपाटात मी तटकरे साहेबांची एक तस्वीर लावली आहे तिला बघितल्या शिवाय मला समाधान वाटत नाही,तटकरे साहेब जन्माला आले नसते तर तळा तालुक्याचा विकास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन मिळाली नसती अशा प्रकारे आप आपल्या भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमा पूर्वी कैलास पाय गुडे यांनी खा.सुनील तटकरे यांना रुद्राक्षाचे रोपटे, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.कैलास पायगुडे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले त्या बद्दल खा.तटकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.          

                    या संवाद कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नानाभौड उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड उत्तम जाधव, गीरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती पायगुडे,कैलास पायगुडे युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,किशोर शिंदे प्रवीण अंबारले,मंगेश भगत,आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog