भजन सम्राट योगेशबुवा पाटील यांची भजन संध्या संपन्न

खारी/ रोहा -केशव म्हस्के

 रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर येथील वर्धमान रेसिडेन्सी निवासी संकुल रहिवासी मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सव प्रसंगी चौथ्या दिवशी अलिबाग  रामराज दापोली येथील सुप्रसिध्द भजन सम्राट योगेशबुवा पाटील यांनी आपल्या वारकरी सांप्रदायिक संगीत भजन बारीच्या माध्यमातून गुरूवार रोजी शास्त्रीय संगीत भजन संध्याचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

    भारत प्रांतांमध्ये सर्वत्र आई कुलस्वामिनी जगदंबेचा जागर निमित्ताने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आई कुलस्वामिनी जगदंब मातेची मूर्तीरूपामध्ये देवीची प्रतिष्ठापना करून दररोज पूजा विधी आरती जागरण गोंधळ हरिपाठ भजन आदी विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देत गरबा दांडिया नृत्य रासक्रीडा खेळून मानवी जीवनात आनंद उत्साह आणि जगदंबेच्या अतुलनीय पराक्रमाच्या प्रेरणेने प्रेरित होत दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कुलस्वामिनी व कुलदैवताचे नित्यनेमाने नामस्मरण करून कोणतेही पाऊल टाकल्यास यश नक्कीच मिळतो याची अनुभूती देणारा उत्सव म्हणजे आई कुलस्वामिनी जगदंबेचा जागर.


 नवरात्रौत्सव निमित्ताने रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर येथील वर्धमान रेसिडेन्सी निवासी संकुल रहिवासी मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव प्रसंगी चौथ्या दिवशी अलिबाग रामराज दापोली येथील सुप्रसिध्द भजन सम्राट योगेशबुवा पाटील आणि मृदुंगामणी सूर्यकर परकर, तबला वादक सुधीर परकर,अभिजित मेहेतर, मनोहर पाडगे, ध्रुव पाडगे, राधा कृष्ण भजन मंडळ गौळवाडी यांनी आपल्या वारकरी सांप्रदायिक संगीत भजन बारीच्या माध्यमातून गुरूवार रोजी शास्त्रीय संगीत भजन संध्याचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी परिवार आणि नवरात्री उत्सव कमिटी विशेष परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog