जागर स्त्री शक्तीचा,सन्मान नारीचा

कोलाड मध्ये ६०० फ्रंटलाईन वुमन वर्कसचा सन्मान

रोहा-प्रतिनिधी

रायगडचे खासदार श्री.सुनिलजी तटकरे साहेब आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या तर्फे जागर स्त्री शक्तीचा-सन्मान नारीचा. 

नवरात्री उत्सवा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला  रोहा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका ताई ,अंगणवाडी मदतनीस व आशा सेविकाताई यांचा सन्मान माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सुमारे 600 महिलांचा सन्मान करण्यात आला.

 प्रास्ताविक सौ.प्रीतमताई पाटील महिला तालुकाअध्यक्षा यांनी केले. 

          या कार्यक्रमात वरसगांव येथील अंगणवाडी सेविका सौ.सुविधा सहदेव कापसे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या प्रयत्नाने १९९६ साली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत रोहा, माणगाव व सुधागड येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाली व त्यात आम्हांला नोकरी मिळाली. म्हणून खासदार सुनिलजी तटकरे साहेबांना धन्यवाद दिले मा. राज्यमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांनीही लहान वयात त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठी पदे भूषविली आहेत, मी त्यांना शुभेच्छा देते व त्यांची प्रगती अशीच पुढे होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. अंगणवाडी सेवकांच्या मानधनात वाढ होण्याबाबत आमदार आदितीताईंना आपण प्रयत्न करावेत अशी विनंती करून दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल संंयोजकांचे आभार मानले.

पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या मनोगतात  सर्व महिलांचे त्या करीत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. भविष्यात येणार्‍या अडचणी वर मदत करण्याचे आश्वासन दिले. अंगणवाडी सेविका सुविधा कापसे,सुपरवायझर ज्योती घाडगे, आशा सेविका रविना मोरे, प्रियांका मोरे यांनी आजच्या सन्मानबद्दल आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन राखी पाटील यांनी केले. 

व्यासपीठावर आमदार आदिती ताई तटकरे, तालुका अध्यक्षा प्रितम पाटील, सरपंच सुरेश महाबळे,उपसरपंच जगन्नाथ धनावडे, मुख्याध्यापक शिरीष येरुणकर सर,सिद्धी राजिवले, सरपंच विशाखा राजिवले, कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर,रोठ सरपंच गीता मोरे,हिलदा फर्नाडिस, सुप्रिया जाधव, सारिका दळवी, रोशनी बेर्डे, अपर्णा कोंडे, सुरेखा पार्टे, स्नेहा ताडकर,सान्वी बाईत,सारिका खंडागळे, युवती कार्यकर्त्यां सौम्या खडतर,श्वेता विश्वकर्मा उपस्थित होत्या. 


कार्यक्रम द .ग.तटकरे हायस्कूल कोलाड ता.रोहा येथे संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog