कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा तर्फे "जागर युवाशक्तीचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न

रोहा-प्रतिनिधी

 दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा व डॉ. सी डी देशमुख महाविद्यालय रोहा यांचे संयुक्त विद्यमाने *जागर युवाशक्तीचा* कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सदरच्या कार्यक्रमास महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके व गडकिल्ले अभ्यासक , लेखक श्री सुखदजी राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

को.म.सा.प. रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर, सचिव श्री विजय दिवकर, युवाशक्ती प्रमुख श्री नारायण पानवकर, खजिनदार श्री हणमंत शिंदे ,सहसचिव सुधीर क्षीरसागर, युवाप्रतिनिधी कु. निकीता बोथरे, कु. शरद कदम, सौ.सुचेता तटकरे कु. अमिषा बारस्कर यांची उपस्थिती होती . 

सी डी. देशमुख महाविद्यालयातील विदयार्थिनी कु. अमिषा शेट्टे , कु. केतकी सुतार यांनी तसेच प्राध्यापक सुकुमार पाटील डॉ. सम्राट जाधव तसेच कोमसाप शाखा रोहाचे श्री. हनुमत शिंदे, सुधीर क्षीरसागर, श्री. नारायण पानवलकर, कु. शरद कदम, सौ.संध्या विजय दिवकर, कु. निकीता बोथरे, कु. अमिषा बारस्कर,सौ. सुचेता तटकरे यांनी बहारदार कविता सादर केल्या .

 युवकांनी कोमसाप रोहा शाखेच्या परिवारात सामिल व्हा, असे अवाहन सदरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करण्यात आले. लिहा व व्यक्त व्हा. असा संदेश या कार्यक्रमानिमित्त श्री. विजयजी दिवकर यांनी दिला. बोली भाषेतून संपन्न साहित्य निर्माण होते असे उदगार रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ संध्या दिवकर यांनी काढले व सादरीकरण कसे असावे याचे प्रात्यक्षिक गडकिल्ले अभ्यासक श्री सुखदजी राणे यांनी केले. प्राचार्य श्री अतुल साळुंके सर यांनी कोमसाप रोहा शाखेचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुकुमार पाटील व निकीता बोथरे यांनी केले. तर डॉ. सम्राट जाधव सर यांनी आभार मानले.

 सदर कार्यक्रमास श्री.कमलाकर कांबळे, श्री. शत्रुघ्न लोगरे, सौ. खाडे, श्रीम. सीमा भोसले, डॉ. अनिल शिंदे इ. महाविद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog