वरसगांवच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाची अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर कडून दखल
श्री.सहदेव कापसे सर "समाज भूषण" पुरस्काराने आ.आदितीताई तटकरेंकडून सन्मानित
रोहा-प्रतिनिधी
अविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर ,अविष्कार फाउंडेशन रायगड जिल्हा यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२२ वरसगांव ता.रोहा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री.सहदेव तुकाराम कापसे यांना देण्यात आला. श्रीवर्धन जि. रायगड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात श्री.सहदेव कापसे सरांना, रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री,विद्यमान आमदार कु. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते व आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार, रायगड जिल्हाध्यक्ष संदीपजी नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष रविंद्र चौधरी पाटील,अविष्कार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी कंठाळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विभागातील लोकांसाठी कार्याची दखल घेऊन दरवर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये दैदीप्यमान यश मिळाल्याबद्दल पुरस्कार दिला जातो.
श्री.सहदेव कापसे यांनी आपल्या सेवाकाळात विविध शाळांवर उत्तम सेवा बजावून अनेक गुणवान विद्यार्थी घडविले.रोह्याच्या शैक्षणिक,सामाजिक,कला,क्रिडा क्षेत्रातील एक आदरणीय नाव म्हणून श्री.सहदेव कापसे सरांकडे पाहिले जाते.अशा अष्टपैलु व्यक्तीमत्वाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.सहदेव तुकाराम कापसे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. अनेक शिक्षक, समाज बांधव व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment