रोहेकरांच्या रेल्वे समस्या व लोकल सुरू करण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार सुनिल तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांची भेट

रोहा-प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात रोहा ते पनवेल आणि दिवा असा प्रवास करताना सकाळी ०५वा.१५ मिनिटानंतर एकही ट्रेन उपलब्ध नसल्याने प्रवशांना होत असलेल्या त्रास बद्दल रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे कडे रोहा मधून सकाळी नवीन मेमु गाड्या सुरू कराव्या अशी मागणी लावून धरली आहे. परंतु रेल्वेच्या नकारात्मक मानसिकतेमुळे या गाड्या सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सामान्य रेल्वे प्रवासी , विद्यार्थी , व्यापारी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रोहेकरांच्या ह्या संवेदनशील  प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी, रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने माननीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या.

    समितीने रोहा मधून सकाळी ०६.४५ मी नवीन रोहा-दिवा मेमु आणि ०७.३०नवीन रोहा -दिवा मेमु सुरू करावी अशी मागणी केली आहे.तसेच वाढलेले तिकीट दर पुन्हा पुर्वरत करावे असे सांगितले आहे. 

      कोरोना काळात रोहा थांबा रद्द केलेल्या गाड्याना पुन्हा रोहा येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे ( नेत्रावती , दिवा-सावंतवाडी , तुतारी एक्सप्रेस , दादर-तिरूनवेळी , इंदोर-कोचिवली एक्सप्रेस )लवकरच रोहा मधून वाढीव रोहा-दिवा मेमुच्या फेऱ्या सुरू होतील अशी आशा समितीला आहे.

      रोहा हे मध्य रेल्वेचं अंतिम आणि कोकण रेल्वेच प्रवेश द्वार आहे परंतु याच रोहा मधून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईला जाण्यासाठी रोहा मधून सकाळी फक्त एकच ट्रेन उपलब्ध आहे  त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने सामान्य नोकरदार , विद्यार्थी , व्यापारी यांना होणार त्रास लक्षात घेऊन रोहा मधून सकाळी ०६.४५ आणि सकाळी ०७.३० रोहा - दिवा नवीन मेमु फेरी लवकर सुरू करावी.

याबाबत खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांनी समितीला सांगितले की, याबाबत लवकरच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री.अनिल कुमार लाहोटी यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक लावून रोहा साठी लवकरात लवकर वाढीव मेमु सेवा सुरू होईल असे आपले कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.तसेच वाढलेले तिकिट दर व एक्सप्रेस गाड्या रोह्याला थांबाव्यात तसेच लोकल सुरू करण्याची रोहेकरांची मागणी लवकरच मुर्त रुप घ्यावी यासाठी आपण करीत असलेल्या प्रयत्नांबाबत शिष्टमंडळाला अवगत केले.

         खासदार सुनिलजी तटकरे साहेबांचे रोहेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी गेलेल्या शिष्टंडळात श्री.फैसल अधिकारी ,अध्यक्ष रोहा रेल्वे प्रवासी महासंघ,कार्याध्यक्ष श्री. उदय शेलार साहेब,उपअध्यक्ष श्री.विश्वनाथ जाधव, सचिव कू.संकेत घोसाळकर, सहसचिव कु.प्रमोद गायकवाड, विशेष सल्लागार श्री.गणेश मासक,खजिनदार श्री.भालचंद्र पवार व श्री.विनोद सावरकर, श्री.धवल कजबजे, संतोष पार्टे घोसाळे विभाग सामाजिक कार्यकर्ते रोहा रेल्वे प्रवासी संघटना चे महिला अध्यक्षा सौ.दिव्याताई सुर्वे यांचा समावेश होता.

Comments

Popular posts from this blog