"कलेची जाण आणि जोपासना असणारा तळा तालुका"- खा.सुनिल तटकरे यांचे गौरवोद्गार 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्यावतीने नाचाचे जंगी सामने

तळा- संजय रिकामे

   नाच म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागात त्याकाळी लोकांच्या मनोरंजनासाठी जन्मलेल्या कला आहेत.त्या राज्याच्या सांस्कृतिक लोकधारा आहेत. तळ्या सारख्या कलेच्या क्षेत्रात लौकिक असलेल्या नगरीत असे महोत्सव येथील स्थानिक कलाकारांना मोठे प्रोत्साहन देणारे ठरतात.पहिल्यांदाच तळा तालुक्यात नचाचे जंगी सामने होत आहेत हा तालुका कलेची जोपासना करणारा असून या स्पर्धेत अनेक प्रतिभावंत कलाकारांनी आपली कला सादर केली त्यांचे आभार त्यांनी यावेळी मानले.व पुढील वर्षी असेच सामने भरवले जातील त्यासाठी प्रत्येक नाच मंडळाला दहा हजार रुपयांची देणगी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान कडून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.त्याचप्रमाणे भजन स्पर्धा देखील आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

                    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवाप्रतिष्ठानच्या वतीने तळा तालुक्यातील नाचाचे जंगी कार्यक्रम तळा येथे नुकतेच पार पडले. यावेळी कालिका माता नाच मंडळ पिटसई मुळगाव, गावदेवी नाच मंडळ वाशी हवेली, काळभैरव नाच मंडळ मुठवली तर्फे तळे, श्रीगणेश नृत्य पथक रानवडे, काळभैरव नाचमंडळ निवी, गिरण माऊली नाच मंडळ गिरणे, सोमजाई नाच मंडळ कर्नाळा, काळभैरव नाचमंडळ सोनसडे, काळकाई नाच मंडळ वाशी हवेली, राधाकृष्ण नाच मंडळ मांदाड, काळभैरव नाचमंडळ वांजळोशी, सिंह गर्जना नृत्य कला पथक मालुक, काळभैरव नृत्य कला पथक मांदाड, चमत्कार नाच मंडळ रहाटाड कोळीवाडा, राधाकृष्ण नाच मंडळ वाशी हवेली, लक्ष्मी नारायण नाच मंडळ मांदाड आदी नाच मंडळाने आपली बहारदार कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सर्व नाच मंडळाना ढोलकी, मानधन व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

                       याप्रसंगी तळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, ॲड उत्तम जाधव, नाना भौड, महेंद्र कजबजे, कैलास पायगुडे,किशोर शिंदे,सुरेश महाबळे, रामभाऊ टेंबे, सचिन कदम,शैलेश घोलप, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तळा तालुक्यातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog