तळा -संजय रिकामे

परेल येथे असणारे नाना पालकर स्मृती ट्रस्टचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांनी कोराना काळात अनेक सामाजिक संस्थांकडून रुग्णांना मदत केली, रक्तदान शिबिर लाऊन रक्ताचा पुरवठा केला, गरजूंना अन्न धांन्याचे वाटप केलं, ऑक्सिजनचा पुरवठा केला, रायगड मध्ये चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,या नुकसानीत वैयक्तिक आणि शासकीय क्षेत्रात त्यांनी मदत पोचविली सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम सुरू आहे कृष्णा महाडिक यांचे सर्व सामान्यांच्या मनात घर केले आहे.


सामाजिक क्षेत्रात पहिल्या रांगेत असलेले कृष्णा महाडिक कायम चर्चेत असतात.आता पुन्हा कृष्णा महाडिक यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. स्वरबंध सामाजिक संस्था पुरस्कृत या वर्षीचा स्वरबंध सेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रायगड भुषण कृष्णा महाडिक यांना सावरकर स्मारक शिवाजी पार्क दादर येथे थोर संगीतकार अशोक पत्की व हॉटेल व्यवसायिक उद्योजक विठ्ठल कामत यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून कृष्णा महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog