बारपे लघुपाटबंधारे पूर्णत्वास नेणार -खा.सुनिल तटकरे

महागाव जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न

तळा- संजय रिकामे

रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तळा तालुक्यातील महागाव जिल्हापरिषद गटात सकाळी ११ वाजल्यापासून संध्यकळी ७.०० वाजे पर्यंत विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले यामध्ये कोरखंडे येथे जल जीवन जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना १२.७५ लक्ष, बारपे येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना ४०.७५ लक्ष,महागाव ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन १० लक्ष,अंगणवाडी इमारत लोकार्पण ८.५० लक्ष,विनवली येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना १९.९७ लक्ष,विनवली येथे सभागृह ५ लक्ष, काळसांबडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना ३०.८७ आणि सामाजिक सभागृह ५ लक्ष यांचे भूमिपूजन,गौळवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना २०.२४ लक्ष,अडणाले येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन ,तांबडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमिपूजन ९.२१ लक्ष,तांबडी येथे मनाई मंदिर रस्ता १७ लक्ष भूमिपूजन,तांबडी अंतर्गत रस्ता २.९० उद्घाटन खा.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.     

                                 या भूमिपूजन आणि उद्धघाटन सोहळ्यात आपल्या भाषणात खा.सुनील तटकरे यांनी येथील बारपे लघुपाट बंधारे पूर्णत्वास नेणार असल्याचे सूतोवाच केले.या धरणामुळे या परिसरात रोजगार निर्मिती होऊन उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करता येईल.हे धरण पूर्णत्वास नेण्याचे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.महागाव येथे त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्यांनी सांगितले की ज्यावेळी १९९९ साली तळा तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळी नव्याने निर्मिती झालेल्या पंचायत समिती सभापती विराजमान होण्याचा मान या गावातील भगिनी सौ.साबळे यांना मिळाला तेव्हा पासून या दुर्गम आणि डोंगराळ भागाचा विकास व्हावा ही कार्यकर्त्याची भावना होती आणि ती विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी निवडून दिले.श्रीवर्धन मतदार संघातील आमदार अदिती तटकरे यांना सर्वात जास्त मतांनी निवडून दिलेत.आज त्याच आमदारांनी पालकमंत्री असताना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत.ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घेणे ही ग्रामस्थांची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

             या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड, पंचायत समिती माजी सभापती अक्षरा कदम,माजी रा सभापती गीता जाधव,माजी राजीप सदस्य बबन चाचले, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,चंद्रकांत राऊत,अॕड.उत्तम जाधव,कैलास पायगुडे,सरपंच सुषमा कजबले,नागेश लोखंडे,विठोबा साबळे,तुकाराम खेडेकर,किशोर शिंदे,प्रवीण अंबारले,मंगेश भगत,जगदीश शिंदे,सुनील भौड आदी मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog