कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या विद्यमाने
हिंदी भाषा दिन साजरा
रोहा-प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाची मासिक सभा संपन्न झाली.यावेळी हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला.
सभेची सुरूवात कु.स्वराज दिवकर याच्या सुश्राव्य श्री गणेश वंदनने करण्यात आली.
सुरवातीला सचिव विजय दिवकर यांनी सर्वांचे स्वागत करून सभेचे इतिवृत्तांत वाचन केले.सभेत विषय घेऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेसाठी अध्यक्षा सौ.संध्या विजय दिवकर, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे,उपाध्यक्षा सौ.आरती धारप, सचिव विजय दिवकर, उपसचिव सुधीर क्षीरसागर, युवा शक्ती प्रतिनिधी नारायण पानवकर, कार्यकारिणी सदस्य शरद कदम,आचला धारप, संजीव शरमकर,अजित पाशिलकर, कु.स्वराज दिवकर इ.मान्यवर उपस्थित होते.
सर्व कवी कवयित्री यांनी हिंदी भाषा दिनानिमीत्त स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हिंदी कविता सादर केल्या. तसेच स्वरचित कविता ही सादर करून कार्यक्रमास बहार आणली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री.सुधीर क्षीरसागर यांनी केले.
Comments
Post a Comment