रोहा रेल्वे स्टेशनवर QR कोड वरुन पेपरलेस तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध 

रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश

रोहा-प्रतिनिधी

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा युनिट्स, पुर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या प्रयत्नांने व रोहा रेल्वे स्टेशनच्या सहकार्याने रेल्वे प्रवासी महासंघाच्या मागणीनुसार रोहा रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी येथे चारा QR कोड लावण्यात आले. त्यामुळे आता प्रवाशांना पेपर्स लेस मोबाईल तिकीट काढता येणार आहे. UTS अॕपवर QR code स्कॅन करून सर्व रोहा येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावा तसेच रोहा रेल्वे स्टेशनवर दोन ATVM आॕटोमॅटीक मशिनवर आपण स्वतः पेपर तिकीट काढु शकता ,गुगल पे , फोन पे ,पेटीएम वर ATVM मशीनवर जनरेट झालेल्या QR स्कॅन करून पे करा लगेच तुम्हाला मोबाईल तिकीट काढता येणार आहे.

हे सर्व करण्यासाठी विशेष प्रयत्न रेल्वे प्रवासी महासंघ रोहा युनिट्स चे श्री.फैजल अधिकारी , अध्यक्ष संकेत घोसाळकर : सचिव सौ.रविना मालुसरे -भोसले , भालचंद्र पवार, विश्वनाथ जाधव, प्रमोद गायकवाड,दिव्या सुर्वे ,नरेश कुशवाह, तपस्या कडू, मयुरी जाधव ,पुजा शेलार, सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कित्येक वर्षे रोहा रेल्वे स्टेशनवर मशिन उपलब्ध होती,मात्र QR कोड नसल्याने रोहेकरांना मोबाईल तिकीट काढता येत नव्हते. आता या क्यू आर कोड मुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

               प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध व्यवस्थेबद्दल श्री.सुर्यकांत वाघमारे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ.अध्यक्ष रायगड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog