नागोठणे येथील जलतरण स्पर्धेत कु.प्रथमेश गर्जे याने मारली बाजी
रोहा-प्रतिनिधी
खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने नागोठणे येथे जलतरण स्पर्धेचे शनिवार दिनांक ९ जुलै २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.जोगेश्वरी मंदिराशेजारील मोटेचा तलाव(चौकोनी तलाव)येथे स्पर्धा संपन्न झाल्या.
आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व युवा नेतृत्व विनायक गोळे यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते.
रायगड जिल्ह्यातील अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतलेल्या ह्या भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रोह्याचा बारा वर्षाचा कु. प्रथमेश सिमा गणेश गर्जे हा चौदा वर्षाच्या वयोगटातून प्रथम आला. त्याबद्दल आमदार श्री.अनिकेतभाई तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमेशचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु.प्रथमेश गर्जे याने लहान वयात मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रथमेश याने जलतरणामध्ये अनेक बक्षिसे मिळविली आहेत.कु.प्रथमेश याचे आई-वडिल प्राथमिक शिक्षक आहेत.त्यांनी आपल्या मुलाला पाठबळ देऊन त्याला एका नव्या क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी सिद्ध केले आहे.त्याबद्दल सर्वत्र कु.प्रथमेश व त्याच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment