खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा उडदवणे येथे विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप

रोहा- प्रतिनिधी

खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचा उत्साह संपूर्ण रोहा तालुक्यात अनुभवायला येत आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उडदवणे येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

 विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गरज ओळखून,दूरदृष्टी ठेवून या स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र शिंदे सर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र ठाकूर,पांडुरंग कासारे, संतोष गायकर,मोरेश्वर माळी,रुपेश कोल्हटकर ,प्रसाद गायकर,दर्शना गायकर,अनिल खंडागळे,सरिता गायकर,किशोर ठाकूर,दत्ता गायकर यांनी अथक परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog