दिव्यांग्यांना सक्षम करण्यासाठी शासना बरोबर समाजाचे सहकार्य अपेक्षित-आ.अदिती तटकरे
तळा शहरात दिव्यांग्यांना धनादेश वाटप
तळा- संजय रिकामे
तळा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना सन २०२१-२२ या वार्षिक वर्षातील ५% दिव्यांग निधीचे वाटप श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार कु. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते तळा शहरातील गणेश मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास त्यांना सहकार्य केल्यास ते अधिक सक्षम होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे,दिव्यांग संघटना तळा तालुका अध्यक्ष किशोर पितळे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे तालुका अध्यक्ष नाना भौड, नगरसेवक मंगेश शिगवण,अविनाश पिसाळ,नरेश सुर्वे,रितेश मुंढे,नगरसेविका अर्चना तांबे,सारिका गवळी,माधुरी घोलप,स्वीकृत नगरसेवक प्रकाश गायकवाड,भास्कर गोळे,मुख्याधिकारी श्री.चव्हाण नगरपंचायत कर्मचारी वर्ग आणि दीव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की अपंग बांधव संघटित होत असल्याने यापुढे एकही अपंग राज्याच्या शासकीय योजना व लाभापासून वंचित राहणार नाही. पाच टक्के निधी वापराबाबत जनजागृती झाली आहे.तळा नगरपंचायती कडून त्याची अंमलबजावणी होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला दिव्यांग बांधवांची जी यादी आहे त्या यादीमध्ये कपात होता कामा नये दरवर्षी या बांधवांना लाभ मिळावा अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या मतदासंघातील आमदार म्हणून सत्ता असो या नसो तळा शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तळा नगरपंचायत प्रशासकीय इमारतीसाठी एक कोटी किंवा त्यापेक्षा लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आमदार अदिती तटकरे यांनी नेहमीच अपंग वृद्ध निराधार महिलांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. अनेक गावांमध्ये विकास निधी देऊन मतदार संघामध्ये विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यमंत्री असताना मतदार संघातील समस्या सांगून निधी खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे त्यांच्या या कार्यावर श्रीवर्धन मतदार संघातील मतदारांच्या अपेक्षा वाढल्या असून आमदार आदिती ताई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर जनता समाधानी असल्याचे पहावयास मिळत आहे. राज्यात सत्तांतर जरी झाले असले तरी हताश होऊन न बसता जनतेला मायबाप समजून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न त्या कसोशीने करत आहेत.जनतेने विकासासाठी पाहिलेले स्वप्न माजी मंत्री विद्यमान खा.सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये आ.अदितीताई तटकरे पूर्ण करत आहेत त्याबद्दल जनता समाधान व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक प्रकाश गायकवाड यांनी केले तर आभार दिव्यांग संघटना तळा तालुका अध्यक्ष किशोर पितळे यांनी मानले.
Comments
Post a Comment