बकरी ईद निमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

पनवेल-प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती पनवेल शाखा, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन आणि ईतर सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच  रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल यांच्या सहकार्याने शनिवारी ९ जुलै रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात एकूण ५० जणांनी उपस्थिती होती. तसेच ३० जणांनी यावेळी रक्तदान केले. 

९ जुलैला सकाळी ९.३० वाजेपासूनच रक्तदाते येण्याला सुरुवात झाली होती. सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन ‘मानवता जपा’ आणि ‘हीच आमुची प्रार्थना, हेच आमचे मागणे’ या दोन गाण्यांनी झाली. महाराष्ट्र अंनिसच्या सुशिला मुंडे, राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दिन शेख, पत्रकार व संपादक किरण बाथम, ईतर राज्य कार्यकर्ते व रोटरी क्लब चे आणि पनवेल येथील शेलार हॅास्पीटल च्या डॅाक्टर शेलार यावेळी उपस्थित होते. यावेळी अल्लाउद्दिन शेख यांनी ‘ईद-उल-अजहा' (बकरी ईद) निमित्त बोलताना त्याग या मुल्याचा उल्लेख करत “बकरी ईद साजरी करताना रक्तदान करुन आपण बंधुभाव, प्रेम, आपुलकी जपण्याचे काम केलेले आहे. सर्व धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करण्याचा विचार व्हायला हवा. आज “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेला पर्याय म्हणून रक्तदान करुन आपण सर्वांना दिलेला मानवतेचा संदेश महत्वाचा आहे” हे नमूद केले. 

या रक्तदानासोबत येणाऱ्या प्रत्येकाने मोफत आरोग्य तपासणी केली. नवीन पनवेलमधील शेलार हॅास्पीटलच्या मौल्यवान अशा विनामूल्य सुविधांचा म्हणजेच रेग्युलर शुगर चेक अप, ईसीजी ईत्यादींचा यावेळी सर्वांना उपयोग करुन घेता आला. महाराष्ट्र अंनिसच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुशीला मुंडे यांनी, “धर्माची विधायक चिकित्सा करणे हे महाराष्ट्र अंनिसच्या पंचसूत्रीतील महत्वाचं सूत्र आहे त्यामुळे त्यावर सातत्याने नवनवीन पद्धतीने विचार मांडणारी महाराष्ट्र अंनिसची तरुण पनवेल शाखा अनेकांना प्रोत्साहन देत आहे” असे म्हणत त्यांनी सर्व सहभागी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog